हार्दिक अन् नताशाचा मुलगा क्रुणाल पांड्याच्या घरी शिफ्ट?; आधी फोटो अन् आता व्हिडीओची चर्चा

क्रुणालने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. याआधी देखील क्रुणालने एक फोटो पोस्ट केला होता.

Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians )

Related News

 कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविक (Natasha Stankovic)

 यांच्या घटस्फोटप्रकरणी सध्या कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

मात्र यादरम्यान एक अपडेट समोर आली आहे. हार्दिक पांड्या आणि नताशाचा

मुलगा अगस्त्य सध्या क्रुणाल पांड्याच्या घरी आहे. अगस्त्य हा क्रुणाल आणि त्याची पत्नी पंखुडी शर्मासोबत वेळ घालवत आहे. 

क्रुणालने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. याआधी देखील क्रुणालने एक फोटो पोस्ट केला होता.

क्रुणालने त्याला सध्या आपल्या घरी आणल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हिडीओ आणि आधीच्या सोशल मीडिया पोस्ट्स पाहिल्यास अगस्त्य काही दिवसांपासून कृणालच्या

घरी शिफ्ट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हार्दिक पांड्याला आगमी टी-20 विश्वचषक 2024 खेळायचा आहे. 

घटस्फोटाच्या चर्चांवर पांड्या-नताशाचं मौन –

महत्त्वाची बाब म्हणजे पांड्या आणि नताशाच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत.

मात्र अद्याप दोघांकडूनही यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यासोबतच पांड्याचा भाऊ क्रुणालही काही बोलला नाही.

अलीकडेच नताशाला घटस्फोटाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तिने या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले आणि निघून गेली.

नेमकं प्रकरण काय?

हार्दिक आणि नताशा यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्वी नताशा

तिचे नाव नताशा स्टॅनकोविक पांड्या असे ठेवायची, पण आता तिने तिचे नाव पूर्णपणे काढून टाकले आहे.

4 मार्च रोजी नताशाचा वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या दिवशी देखील हार्दिक पांड्याने कोणतीही पोस्ट देखील केली नाही.

नताशाने तिच्या आणि हार्दिकच्या अलीकडील सर्व पोस्ट डिलीट केल्या. याशिवाय नताशा यावेळी

आयपीएल मॅच पाहायलाही आली नाही. तसेच नताशाने मुंबई इंडियन्सच्या समर्थनार्थ काहीही पोस्ट केली नाही.

पांड्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा भाग-

हार्दिक पांड्या हा 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग आहे. या स्पर्धेपूर्वी

टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. यानंतर त्याचा पहिला सामना 5 जूनला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी सामना होणार आहे. 

Read Also https://ajinkyabharat.com/

Related News