हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद

हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद

अकोला | १३ एप्रिल २०२५

गांधी नगर सिंधी कॅम्प येथील श्री इच्छेश्वरी माता मंदिर चौक येथे श्री इच्छेश्वर मित्र परिवार

मंडळाच्या वतीने हनुमान जयंती निमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Related News

संध्याकाळी ७ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत पार पडलेल्या या कार्यक्रमात श्री हनुमान चालीसा पठण,

भजन-कीर्तन व प्रसाद वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री हनुमानजींच्या जयघोषात मंदिर परिसर भक्तिमय झाला.

भजन-कीर्तनाच्या माध्यमातून वातावरण पूर्णतः पावन झाले होते व उपस्थित भक्तगण भक्तिरसात चिंब भिजले.

श्री इच्छेश्वर मित्र परिवार मंडळाच्या मेहनतीमुळे कार्यक्रम अतिशय यशस्वीरीत्या पार पडला.

सर्वांनी एकत्र येऊन बजरंगबलीच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली.

कार्यक्रमाची सांगता प्रसाद वितरणाने करण्यात आली आणि सर्व उपस्थित भक्तांनी समाधानाने कार्यक्रमाचा आनंद घेतला.

जय श्रीराम। जय बजरंगबली।

Read Also : https://ajinkyabharat.com/patur-yehete-bouchant-guru-shishya-jayanti-saji/

Related News