“गुरुपौर्णिमेला शिंदेंची दिल्ली वारी, शाहांच्या चरणांवर टीका” – संजय राऊतांचा हल्लाबोल

"गुरुपौर्णिमेला शिंदेंची दिल्ली वारी, शाहांच्या चरणांवर टीका" – संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई | प्रतिनिधी

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर बोचरी टीका केली आहे.

त्यांनी शिंदेंनी गुरुपौर्णिमेनिमित्त अमित शाह यांचे ‘चरण धुतल्याची’

Related News

उपरोधिक टीका करत दिल्ली भेटीमागील राजकीय हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राऊतांच्या म्हणण्यानुसार, शिंदे व शाह यांच्यात मुंबईतील मराठी एकजूट फोडण्यावर चर्चा झाली.

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये राऊतांनी “धर्मवीर” चित्रपटातील एका दृश्याची आठवण करून देत टीकास्त्र सोडलं आहे.

त्याचबरोबर शिंदेंच्या या दौऱ्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व राजनाथ सिंह यांच्याशीही चर्चा झाल्याचे समोर आलं आहे.

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिंदे गटाची रणनीती ठरवली गेल्याचे संकेत मिळत आहेत.

दुसरीकडे राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य सहकार्यामुळे नव्या राजकीय समीकरणांची शक्यता वाढली असून,

भाजप-शिंदे गटासाठी हे मोठं आव्हान ठरू शकतं, असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/snakesh-jhaleli-yuva-shetkyala-pinjar-te-akola-40-minutes-banana-rugnalaya/

Related News