मूर्तिजापूर (प्रतिनिधी) – श्री गाडगे महाराज महाविद्यालय, मूर्तिजापूरच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन यशस्वीपणे संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. एम. एस. यादव होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. ए. एल. गायकवाड यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी महानगरांमध्ये उपलब्ध विविध संधी शोधून त्याचा लाभ घेण्याचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन प्रा. वैश्नवी शर्मा यांनी केले. त्यांनी कला आणि वाणिज्य शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांना व्यवसाय व्यवस्थापनातील पुढील शिक्षण संधी व त्या मिळवण्यासाठी आवश्यक प्रवेश परीक्षा याबाबत माहिती दिली. तसेच, व्यवसाय पूरक शिक्षण घेऊन कौशल्य विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रा. डॉ. एम. एस. यादव यांनी विद्यार्थ्यांना सतत नवीन शिक्षण संधी शोधून, त्या क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करण्याचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी व्यवसाय संबंधित ज्ञान, तंत्रज्ञानाचे समज, तसेच नेतृत्व व संघटन कौशल्ये आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. भारती बाजड यांनी आभार प्रदर्शन केले.
Related News
मूर्तिजापूर प्रतिनिधी : मूर्तिजापूर-अकोला महामार्गावरील भटोरी येथील नितीन विद्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर पातळीवर पोहोचला आहे. शाळेसमोरून वेगाने धावणाऱ्या...
Continue reading
महाराष्ट्रातील मूर्तिजापूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत शेरवाडी (शेलूवेताळ) येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे २४ लाख रुपयां...
Continue reading
पालघर जिल्ह्यातील चहाडे येथील सूर्या व्हॅली स्कूलमध्ये भारत-जपान सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच यशस्वीरित्या पार पडले. या कार्यक्रमात जपान इंडिया कल्चरल सोसायटीचे ...
Continue reading
पवित्र रमजान महिन्यानिमित्त मूर्तिजापूरमध्ये रोजा, नमाज आणि प्रार्थनेचे वातावरण सर्वत्र पहायला मिळत आहे. या धार्मिक वातावरणात अवघ्या ५ वर्षांच्या मो. शहरोज मो. इमरान आणि ९ वर्षां...
Continue reading
मूर्तिजापूर प्रतिनिधी : एकात्मिक समाज शिक्षण प्रसारक मंडळ गांधीग्राम द्वारा संचालित श्री शंकर विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शनिवार, दि. १४ फेब्रुवारी ...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती...
Continue reading
श्री गाडगे महाराज महाविद्यालय, मूर्तिजापूर येथे समाजशास्त्र विभागाच्या वतीने सामान्य मानसिक आरोग्य या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्...
Continue reading
मूर्तिजापूर प्रतिनिधी – मूर्तिजापूर नगर परिषदेत स्थायी व विविध विषय समित्यांची निवडणूक नुकतीच पार पडली आणि सर्व पदांची निवड अविर...
Continue reading
मूर्तिजापूर: स्थानिक राजकारणात आज, १३ जानेवारी २०२६ रोजी, नगरपरिषदेतील उपाध्यक्ष व स्वीकृत सदस...
Continue reading
मूर्तिजापूर :मुर्तिजापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी कामगिरी करत जामठी बु. येथील लक्ष्मी वेणुताई मच्छिंद्र चक्रन...
Continue reading
मूर्तिजापूर: सामाजिक सलोखा, जनसेवा आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मूर्तिजापूर येथील प्रा. सुधाकर गौरखेडे यांची ‘मानवतावादी सांस्कृतिक चळवळ, कोल्हापूर’ आयोजित
Continue reading
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. राधा गीरी यांनी केले. या प्रसंगी प्रा. डॉ. एन. एम. बनसोड, प्रा. विजय बेलखेडे, प्रा. सुप्रिया इंगोले, प्रा. श्रीया तांबडे, प्रा. एस. एम. शामसुंदर, प्रा. राजेंद्र वाकडे, प्रा. तुषार रडके तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी हा मार्गदर्शन कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरला आणि त्यांनी आपले शैक्षणिक व व्यावसायिक भवितव्य घडवण्यासाठी नवे ध्येय निश्चित करण्याचा संकल्प केला.
read also : https://ajinkyabharat.com/gadegaon-grampanchayatil-vikas-kaamchi-ceo-anita-meshram-kekarkadu-pahani/