जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन :

जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन :

पुणे 

जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक डॉ. जयंत नारळीकर यांचं पुण्यातील राहत्या घरी निधन झालं आहे.

ते ८६ वर्षांचे होते. पहाटे झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञान आणि साहित्यविश्वात शोककळा पसरली आहे.

Related News

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ

कोल्हापूरमध्ये १९ जुलै १९३८ रोजी जन्मलेले जयंत नारळीकर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ होते.

त्यांच्या वडिलांनी गणितशास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं तर त्यांच्या आई संस्कृत विदुषी होत्या.

बनारस हिंदू विद्यापीठात शालेय शिक्षण पूर्ण करून नारळीकर पुढील शिक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठात गेले.

तेथे त्यांनी फ्रेड हॉईल यांच्यासोबत काम केलं, आणि ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ जगात गाजला.

त्यांनी स्फोट सिद्धांताला (Big Bang) विरोध करत वैकल्पिक सिद्धांत मांडले.

भारतातील खगोलशास्त्र संशोधनाचा पाया रचणारे शास्त्रज्ञ

भारतात परतल्यावर त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (TIFR) काम केलं. १९८८ मध्ये त्यांनी पुण्यातील आयुका

(IUCAA) या खगोलशास्त्र संस्थेची उभारणी केली, ज्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. 1972 मध्ये

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना खास बोलावलं होतं, ही गोष्ट त्यांच्या शास्त्रीय स्थानाची साक्ष देते.

मराठी विज्ञानसाहित्याचा समृद्ध वारसा

शास्त्रज्ञ असूनही डॉ. नारळीकर हे रसाळ मराठीतून विज्ञान विषय सोप्या भाषेत मांडणारे विज्ञानकथाकार आणि लेखक होते.

त्यांनी ‘टाइम मशीनची किमया, ‘वामन परत न आला, ‘चला जाऊ अवकाश सफरीला’, ‘प्रेषित

अशा अनेक मराठी विज्ञानकथा लिहिल्या. त्यांच्या लेखनामुळे अनेक तरुणांना विज्ञानाकडे आकर्षित केलं.

गौरव आणि सन्मान

  • पद्मविभूषण – 2004

  • महाराष्ट्र भूषण – 2010

  • साहित्य अकादमी पुरस्कार – 2014

शोध आणि साहित्य एकत्र करणारा महामानव

डॉ. नारळीकर यांनी शास्त्र आणि साहित्य एकत्र आणत एक दुर्मिळ असा पुल तयार केला.

त्यांच्या निधनानंतर खगोलशास्त्र अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी प्रतिक्रिया दिली –

“ते आधुनिक खगोलशास्त्राचे उद्गाते होते. त्यांच्या जाण्याने हे पर्व संपले आहे.”

भारतीय विज्ञान आणि सर्जनशीलतेचा एक उजवा दीप मावळला आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/kharip-rupanasathi-shetkyana-direction/

Related News