पिंपळखुटा येथील जय बजरंग शाळेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न….

पिंपळखुटा येथील जय बजरंग शाळेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न....

पिंपळखुटा( वार्ताहर )
येथील जय बजरंग व्यायाम शाळेच्या 32 वा वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
31 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस व याच दिवशी पिंपळखुटा येथे

जय बजरंग व्यायाम शाळा (केंद्र- कुंभारी) ची स्थापना झाली होती.जय बजरंग व्यायाम शाळेच्या माध्यमातून येथे वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

यामध्ये रोगनिदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर व विविध मैदानी खेळाचा समावेश राहतो.

Related News

यावर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करून 31 डिसेंबर साजरा करण्याचा वेगळाच आनंद

जय बजरंग व्यायाम शाळेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक व सदस्य यांच्यासह गावातील तरुण मित्र मंडळीच्या चेहऱ्यावर दिसत होता.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यायाम शाळेची पदाधिकारी व गावातील तरुण मंडळीने विशेष परिश्रम घेतले.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/valmik-karadcha-encounter-resignation-letter-guardian-minister-dhananjay-munde-spoke-for-the-first-time-to-the-media/

Related News