कामरगाव : कारंजा तालुक्यातील कामरगाव हे ग्रामीण भागातील महत्त्वाचे व व्यापारीदृष्ट्या
वर्दळीचे ठिकाण असून आजूबाजूच्या गावांसाठी येथे मोठी बाजारपेठ भरते.
मात्र, ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणि मुख्य रस्त्यालगत दीर्घकाळापासून अतिक्रमण झाले होते.
या अतिक्रमणामुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक विस्कळीत होत होती.
ग्रामस्थ तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज मार्गक्रमण
करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या समस्येची गंभीर दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात मोठ्या बाजारपेठ परिसरातील
अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई राबवली.
वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे अडथळे दूर करून परिसर मोकळा करण्यात आला.
या कारवाईनंतर बाजारपेठ परिसर आणि मुख्य रस्ता पूर्णपणे मोकळा झाल्याने वाहतूक सुरळीत झाली
असून ग्रामस्थ व व्यापाऱ्यांकडून ग्रामपंचायतीच्या या पावलाचे कौतुक करण्यात येत आहे.
तसेच,
गावातील आठवडी बाजारातील रस्त्यावरच्या वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण काढण्याची
गावकऱ्यांना सरपंचांकडून अपेक्षा असल्याचे मत गावकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/shetkayanwar-ekach-vee-kamancha-tan/
