ग्रामपंचायत माळेगाव बाजार येथे नाली बांधकामात मोठा भ्रष्टाचार

ग्रामपंचायत माळेगाव बाजार येथे नाली बांधकामात मोठा भ्रष्टाचार

ग्रामपंचायत माळेगाव बाजार येथे नाली बांधकामात मोठा भ्रष्टाचार

माळेगाव बाजार प्रतिनिधी अजिंक्य भारत

तेल्हारा तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले माळेगाव बाजार ग्रामपंचायत ही खूप मोठी आहे

या ग्रामपंचायती सदस्य संख्या 12 असून या ग्रामपंचायत मध्ये वार्ड क्रमांक दोन मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे

त्यांच्या समवेतच नाली बांधकाम सुद्धा करण्यात आले आहे या नाली बांधकामाचा निधी जवळपास अंदाजे सहा लाख रुपये इतका आहे

यामध्ये या बांधकामाचे कंत्राटदार प्रसाद देशमुख तेल्हारा यांच्याकडे आहे तसेच या बांधकामामध्ये कमी दर्जाचे लोखंड वापरण्यात आले आहे

तसेच बऱ्याच ठिकाणी कामांमध्ये तफावत दिसून येत आहे हा जो भ्रष्टाचार आहे

या भ्रष्टाचाराविषयी गावातील सुज्ञ नागरिक ग्रामपंचायत सदस्य सुलभा संतोष काकडे यांनी ठेकेदाराला

विचारणा केली असता त्यांनी त्याला उडवा उडवीची उत्तरे दिली तसेच सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे

त्यामुळे या गावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे घबाळ उघडकीस येणार आहे त्यामुळे सर्व गावाकऱ्यानी एकत्र येऊन ग्रामसेवक,

सरपंच,व ठेकेदार,यांना सर्वतोपरी विचारपूस करून दर्जेदार व उत्तम काम करावे यासाठी सर्वांनी मिळून एकत्र यायचे आहे

पण जो काही बांधकामात भ्रष्टाचार चालू आहे व जे बांधकाम आहे

ते त्वरित बांधकाम थांबविण्यात यावे याची वरिष्ठ अधिकारी यांनी त्या बांधकामाची चौकशी करावी जे नाली बांधकाम चालू आहे

त्या कामांमध्ये सिमेंट रेती व लोहा खूप कमी प्रमाणात वापरण्यात येत आहे

अतिशय मोठ्या ग्रामपंचायत मध्ये व गजबजलेल्या ठिकाणी ही ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत ही कामे चालू आहेत

ही कामे चांगल्या रीतीचे व्हावे व शासनाने दिलेल्या निधीचा चांगल्या प्रकारे उपयोग व्हावा यासाठी सर्व सदस्यांनी

एकत्र येऊन या ठेकेदाराला व सरपंच साहेबांना विचारून काम चांगले करावे अशी गावातील बऱ्याच नागरिकांमध्ये ही चर्चा चालू आहे.

 

 

अधिक बातम्या करीता भेट द्या

                   https://ajinkyabharat.com/never-you-could-not-hear-i-could-not-say/