सीईओ अनिता मेश्राम : जिल्हा परिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात
अकोला :
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी
Related News
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
हिवरखेड परिसरात वृक्षारोपण; पत्रकार संघटनेकडून पर्यावरण पूजन
३८ वर्ष आरोग्य सेवा दिल्यानंतर वृंदा विजयकर यांचा सेवानिवृत्त सत्कार सोहळा पार पडला
मनभा परिसरात संततधार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
हिंदी जीआरवर सरकारची माघार; ठाकरेबंधूंच्या एकतेमुळे मराठी ताकद उभी – संजय राऊतांचा दावा
हिंदी सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक; “जाधव येऊ देत की कोणीतरी… आम्ही खपवून घेणार नाही!”
अकोला जिल्ह्यात व्यवसाय शिक्षण अधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत
शिक्षण राज्यमंत्री यांच्या हस्ते श्री शिवाजी विद्यालयाच्या गौरी व वैभवीचा सत्कार
योजनांची यशस्वी अंमलबजावणी करुन सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ग्रामविकासावर भर द्यावा,
असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अनिता मेश्राम यांनी केले.
महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा परिषद मुख्यालयाच्या प्रांगणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
तथा प्रशासक अनिता मेश्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपस्थितानी राष्ट्रगीत व राज्यगीत गायन केले.
त्यानंतर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला .
याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक मनोज जाधव,
सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समाधान वाघ ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विभाग राजश्री कोलखेडे,सहाय्यक गटविकास अधिकारी
पंचायत विभाग हरिनारायण परिहार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग अनिता तेलंग ,
प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार , माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलोचना पाटेकर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद येथे महाराष्ट्र दिन साजरा करताना, स्काऊट आणि गाईड या विद्यार्थ्यांची परेड आयोजित केली अ
सता या परेडमध्ये विद्यार्थी त्यांच्या औपचारिक पोशाखात सहभागी होते.
जि. प. अधिकाऱ्यांचा गुणगौरव
ग्रामविकासाच्या विविध कल्याणकारी योजनांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक मनोज जाधव,
जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समाधान वाघ , सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत विभाग हरिनारायण परिहार,
पंचायत विभागातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रवीण गोळे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सीईओ अनिता मेश्राम यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
Read Also : https://ajinkyabharat.com/aamdar-pathan-yancha-aghavegala-vaddivas/