सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारची मुदत आज संपणार!

मराठा

मराठा आरक्षणासाठी शांतता रॅली आणि सभा घेतल्यानंतर

आज मराठा आंदोलक मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्ये

रॅलीचा समारोप करण्यात आला.

Related News

त्याशिवाय आज 13 जुलै रोजी सगेसोयऱ्यांच्या अटीसह मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देत

अध्यादेश काढण्यासाठी सरकारला दिलेला अल्टीमेटम आज संपत आहे.

दरम्यान, रॅलीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक एकत्र येणार असून

शहरात जय्यत तयारी करण्यात आली होती.

शहरातील सिडको चौकातून सकाळी 11.30 या रॅलीला सुरुवात होऊन

नंतर क्रांती चौक येथे समारोप झाला.

चौकाचौकात रॅली ची जय्यत तयारी करण्यात आली होती.

रॅलीच्या मार्गावर 250 भोंगे, 5 हजार झेंडे लावण्यात आले असून

शहरात ठिकठिकाणी 800 बॅनर लावण्यात आले होते.

तर 13 ठिकाणी स्वागतासाठी कमानी बांधण्यात आल्या होत्या.

रॅलीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकत्र आले असून

शहरातील वेगवेगळ्या 8 चौकांमध्ये तब्बल 300 क्विंटल जेवणाची तयारी करण्यात आली होती.

Read also: https://ajinkyabharat.com/%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a0-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%82/

Related News