राज्यसरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
राज्यात सुपर हिट झाली आहे. गावागावातून या योजनेला मोठा
प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाखो महिलांना लाभ झाला आहे.
Related News
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
मुर्तीजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांनी घेतली गस्त मोहीम हाती
सरकारनेही मुक्त हस्ते महिलांना 1500 रुपये दिले आहेत.
त्यामुळे महिलावर्गातून आनंद व्यक्त होत आहे. मात्र, आता या
योजनेबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. लाडकी
बहीण योजनेचा अर्ज स्वीकारण्याशी संबंधित हा निर्णय आहे.
या निर्णयामुळे महिलांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
या योजनेतून सरकारकडून महिलांना 1500 रुपये देण्यात येत आहेत.
ही योजना यशस्वी व्हावी म्हणून सरकारने मोठ्या प्रमाणावर
सरकारी यंत्रणा कामाला लावल्या होत्या. सरकारने आशा सेविका,
सेतू सुविधा केंद्र, ग्राम सेवक, आपले सरकार केंद्र, मदत कक्ष अशा 11
प्राधिकृत संस्थांकडून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेतले जात होते.
आता या 11 प्राधिकृत संस्थांकडचे अर्ज भरून घेण्याचे अधिकार
रद्द करण्यात आले आहेत. यापुढे केवळ अंगणवाडी सेविकांमार्फत
आलेलेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत. म्हणजे ज्या महिलांना या
योजनेचे अर्ज भरायचे आहेत, त्यांना अंगणवाडी सेविकांकडे
जाऊनच अर्ज भरावे लागणार आहेत. तेव्हाच त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/violence-again-in-manipur/