Gold Silver Rate Today 5 March 2025 : कालच सोने आणि चांदीने दरवाढीचे संकेत दिले होते.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही धातुच्या दरवाढीचा आलेख उंचावला.
आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…
Related News
सोने आणि चांदीने या आठवड्याच्या सुरुवातीलाच मोठी झेप घेतली. गेल्या आठवड्यात सोने 1200 रुपयांनी स्वस्त झाले होते.
तर चांदी 5 हजारांनी स्वस्त झाली होती. तर या आठवड्यात दोन्ही धातु ग्राहकांना दिलासा देतील का?
याची चर्चा सुरू असतानाच अमेरिकेमधील घडामोडींचा दोन्ही धातुंवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मौल्यवान धातुंनी मोठी झेप घेतली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या
तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…(Gold Silver Price Today 5 March 2025 )
सोने 760 रुपयांनी वधारले
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे बेशकिंमती धातुविषयी मोठा निर्णय घेण्याची कालपासून चर्चा रंगली आहे.
ट्रम्प सरकार या धातुसाठी काही धोरण ठरवण्याची शक्यता आहे.
त्यामुळे वायदे बाजाराच नाही तर सराफा बाजार धास्तावला आहे. सोमवारी सोने 760 रुपये प्रति तोळा महागले.
गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीची मोठी झेप
मागील आठवड्यात चांदी 5 हजारांनी स्वस्त झाली होती. तर सोमवारी चांदी एक हजार रुपयांनी वधारली.
आज सकाळच्या सत्रात चांदीत महागाईचे संकेत मिळत आहेत.
गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 98,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24
कॅरेट सोने 86,432, 23 कॅरेट 86,086, 22 कॅरेट सोने 79,172 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,824 रुपये, 14 कॅरेट सोने
50,563 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 95,293 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात
सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल.
त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या,
शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात.
Read more here : https://ajinkyabharat.com/chief-minister/