शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या,अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

महायुतीच्या मंत्रीमंडळात स्थान मिळावं म्हणून जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे (Junnar Assembly Constituency) अपक्ष आमदार शरद सोनावणे हे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत. 

 जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे (Junnar Assembly Constituency) अपक्ष

आमदार शरद सोनावणे हे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत. त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे.

त्यामुळं महायुतीच्या मंत्रीमंडळात स्थान मिळावं म्हणून ते आंदोलन करत आहेत. शिवनेरीच्या भूमिला मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशी सरकारला माझी विनंती

Related News

असल्याचे शरद सोनावणे म्हणाले.

नेमकं काय म्हणाले शरद सोनावणे? 

यशवंतराव चव्हाण यांनी शिवनेरीवर पहिला सुवर्ण कलश आणला होता. पहिली कॅबिनेटची बैठक देखील शिवनेरीवर झाली होती.

पण शिवनेरीला मंत्रिमंडळात स्थान नाही. शिवनेरीच्या भूमिला मंत्रिमंडळात स्थान द्यावं अशी सरकारला माझी विनंती

असल्याचे शरद सोनावणे म्हणाले. विधिमंडळात मी निवेदन दिलं आहे. जुन्नर तालुक्याला स्थान द्यावं ही मागणी केल्याचे सोनावणे म्हणाले. दरम्यान,

महायुती सरकार न्याय देईल असा विश्वासा देखील शरद सोनावणे यांनी व्यक्त केला आहे. मी 25 वर्ष झालं राजकारणात आहे. अपक्ष म्हणून निवडून आलो आहे.

आता महायुतीसोबत काम करत असल्याचे सोनावणे म्हणाले.

दोन्ही राष्ट्रवादीला धक्का देत शरद सोनावणे विधानसभेत

पुणे जिल्ह्यात विधानसभेच्या काही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी अशी लढत झाली. जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये देखील राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी आणि अपक्ष अशी लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाने या मतदारसंघात विद्यमान आमदार अतुल बेनके यांना तिकीट दिले असले तरी पुणे

जिल्हा हा शरद पवारांचा राजकीय प्रभाव असलेला मतदारसंघ मानला जात होता. त्यामुळे बेनकेंना यावेळी

फटका बसण्याची शक्यता वर्तण्यात येत होती. मात्र, या मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादींना धक्का बसला आहे.

अपक्ष उमेदवार शरद सोनावणे यांना 73355 इतकी मते मिळाली आहेत. तर विद्यमान आमदार अतुल बेनके

यांना 48100 इतकी मते मिळली आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्यशील शेरकर यांना

66691 इतकी मते मिळाली आहेत.

महत्वाच्या बातम्या:  https://ajinkyabharat.com/famous-builder-ramprakash-

 

 

Related News