घुसर फाटा : जलवाहिनी लिकेजमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, तातडीने दुरुस्तीची मागणी

घुसर फाटा : जलवाहिनी लिकेजमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, तातडीने दुरुस्तीची मागणी

घुसर फाटा प्रतिनिधी घुसर फाटा येथे पाणीपुरवठा

करणाऱ्या मुख्य जलवाहिनीमध्ये झालेल्या

गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.

Related News

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ही गळती सुरू असून,

आतापर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा

अंदाज व्यक्त केला जात आहे.

या गळतीमुळे परिसरात पाणी साचून अडथळा निर्माण झाला

असून, नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

प्रशासनाने या जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करावी,

अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पाण्याचा दुष्काळी काळ लक्षात घेता

जलस्रोतांचे संरक्षण आवश्यक असून,

अशा दुर्लक्षित लिकेजमुळे मौल्यवान पाण्याची नासाडी होणे

अत्यंत दुर्दैवी आहे.

संबंधित विभागाने त्वरीत लक्ष घालून कार्यवाही करावी,

अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

 

Related News