घोडेगाव येथे तेरवीच्या दिवशी संपूर्ण गाव स्वच्छ करून वडिलांना आगळी वेगळी श्रदांजली

घोडेगाव येथे तेरवीच्या दिवशी संपूर्ण गाव स्वच्छ करून वडिलांना आगळी वेगळी श्रदांजली.

अकोल्याच्या तेल्हारा येथून जवळ असलेल्या ग्राम घोडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजु ताथोड यांचे वडील मनोहर

बाळकृष्ण ताथोड यांचे 13 दिवसापूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले.

दरम्यान मनोहरराव ताथोड हे सुवातीपासूनच कृतिशील सामाजिक कार्यकर्ते होते.

Related News

त्यांच्या प्रत्येक कृतीतून आणि वाणीतून ते संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगायचे, त्यांच्याच तालमीत वाढलेले त्यांचे कुटुंब देखील

त्यांच्या संस्काराचा प्रभाव होता.

वडिलांच्या तेरवीच्या दिवशी कुटुंबीयांनी श्रद्धांजली कार्यक्रमात चक्क हातामध्ये खराटे आणि फावडे टोपले घेऊन संपूर्ण गांव स्वच्छ केले.

वडिलांनी आयुष्यभर संत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा यांच्या विचारवर चालेलत म्हणूनच त्यांना श्रद्धांजली देखील या महात्म्यांच्या विचारांना अनुसरूनच असावी.

खरोखर प्रत्येक गावात जर असे स्वच्छतेचे महत्व पटले व प्रत्येकानी ते अंगीकारले तर निश्चितच रोगराई दूर होऊन आरोग्य सुदृढ राहील.

असा प्रत्येकाने आदर्श यातुन घेतला पाहिजे.

Read Also : https://ajinkyabharat.com/danpur-yehehe-lait-yatra-festival-sajra/

Related News