घोडेगाव तेथे तुफान वादळी वाऱ्याने कित्येकाचे संसार उघड्यावर

घोडेगाव तेथे तुफान वादळी वाऱ्याने कित्येकाचे संसार उघड्यावर

दानापुर प्रतिनिधी :-

तेल्हारा येथून जवळच असलेल्या ग्राम घोडेगाव येथे दि. 12 जून रोजी दुपारी 3 वा. च्या सुमारास आलेल्या तुफान वादळी वाऱ्याने

कित्येक लोकांचे संसार उघड्यावर आले तर भले मोठमोठे झाडे उन्मळून पडलीत यामध्ये विद्युत तारा तुटल्या तर काही ठिकाणी विद्युत खांब वाकलेत,

Related News

सविस्तर बातमी अशी की दिवसभर 40 ° सेल्शिअसच्या आसपास ऊन तापत होते अचानक दुपारी 3 वा सुसाट्याचा वारा येतोय व लगेच

त्याचं तुफानी वडाळात रूपांतर व या वादळाने घोडेगाव येथील नसीम खान बशीर खान, संतोष गणपत कवळे, दर्शन संतोष दामोदर,

गजानन यशवंत कवळे यांच्या घरावरील टिन पत्र्याचे छत उडून 100 फूट अंतरावर पडलेत

सुदैवाने यामध्ये कुणाही काही दुखापत झाली नाही दिपक सदाशिव भाकरे यांचे नुकतेच घरकुल आले होते

घरकुलाचे काम लिंटल लेव्हल पर्यंत आले होते वाऱ्याचा वेग एवढा की त्याने लिंटल लेव्हल आलेल्या भिंती भुईसपाट केल्या.

यातील बहुतांश वादळबळी कडे निवाऱ्याची व्यवस्था नाही घरातील अन्नधान्य व झोपायचे अंथरून पूर्णतः पावसात भिजून गेले.

मा. तहसीलदार साहेब, गट विकास अधिकारी, पटवारी व ग्रामसेवक यांनी या अस्मानी संकटात सापडलेल्या लोकांचे तात्काळ

पंचनामे करून शासन स्तरावरून मदत मिळवून द्यावी एवढीच माफक अपेक्षा आमच्या प्रतिनिधिकडे व्यक्त केली.

Read Also :https://ajinkyabharat.com/ahmedabad-aircraft-240-huns/

Related News