अकोल्यातील अकोट आणि ठाण्यातील अंबरनाथ येथे सत्तेसाठी भाजपने काँग्रेस व एमआयएमसोबत केलेल्या हातमिळवणीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कट्टर विरोधकांसोबत स्थानिक पातळीवर युती केल्याने भाजपवर तीव्र टीका होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
एबीपीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.
“भाजपची काँग्रेस किंवा एमआयएमसोबत युती कधीच होऊ शकत नाही. हा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही. पक्षाच्या विचारधारेविरोधात जाणाऱ्यांवर १०० टक्के कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
अकोटमध्ये ‘अकोट विकास मंच’ आणि एमआयएमचा सहभाग
अकोट नगरपालिकेत स्पष्ट बहुमत नसल्याने भाजपने ‘अकोट विकास मंच’ स्थापन केला. मात्र, या मंचामध्ये ओवेसींच्या एमआयएम पक्षाचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले. भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
Related News
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला असून प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री Bachchu Kadu यांच्यावर खुनाचा कट रचल्याचा ग...
Continue reading
रितू तावडे यांनी केलेल्या एका विधानावरून सध्या राजकीय व सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे, श्रद्धा आणि अंधश्रद्धा या वादाच्या पार्श्वभूमीवर त्य...
Continue reading
नाशिकमधील चर्चित अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या Rupali Chakankar यांच्या...
Continue reading
पार्थ पवार आणि राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ येथे झालेली गुप्त भेट, एक ते दीड तास चर्चा, महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यत...
Continue reading
महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. आज विधानसभेत मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी साद...
Continue reading
नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा Ashok Kharat प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. तंत्र-मंत्र आणि दैवी शक्तींचा आव आणत महिलांना जाळ्यात...
Continue reading
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून मोठा राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला असून, नव्या अध्यक्षाच्या निवडीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रुपाली चाकणकर यांनी नुकताच ...
Continue reading
महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने केवळ सामाजिक नव्हे तर राजकीय पातळीवरही मोठी खळबळ उडवली आहे. या प्रकरणावरून आता आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण तापले असू...
Continue reading
मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेविका Alka Kerkar यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी Lilavati Hospi...
Continue reading
सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला असून, भाजपने अवघ्या तीन मतांच्या फरकाने सत्...
Continue reading
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गुढीपाडव्याचा दिवस नेहमीच महत्त्वाचा मानला जातो. गुढी पाडवा निमित्त शिवाजी पार्क येथे आयोजित मेळाव्यात राज...
Continue reading
मुंबई, 19 मार्च 2026: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवाजी पार्क...
Continue reading
अंबरनाथमध्ये थेट काँग्रेसशी हातमिळवणी
दुसरीकडे, अंबरनाथ नगरपरिषदेत शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने थेट काँग्रेससोबत युती केली. ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा देणाऱ्या भाजपने सत्तेसाठी विचारधारा बाजूला ठेवल्याची टीका विरोधकांकडून जोर धरत आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कठोर भूमिकेमुळे आता संबंधित स्थानिक नेत्यांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/priya-bapat-competes-with-shweta-tiwari-see-7/