उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप;

उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप;

अकोला – छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त

अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प आणि निलेश देव मित्र मंडळ यांच्या वतीने

‘डोनेट युवर सायकल’ उपक्रम राबविण्यात आला.

Related News

या उपक्रमाला अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून,

११ जुन्या सायकली संकलित करून गरजू विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या.

विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपक्रम

या उपक्रमामुळे विद्यार्थी शाळा व शिकवणी वर्गात सहज जाऊ शकतील.

विशेषतः मुलींना शिक्षणासाठी मोठी मदत होईल,

तसेच त्यांना अभ्यासासाठी अधिक वेळ मिळेल.

कार्यक्रमाचा आयोजीत सोहळा

हा सायकल वितरण सोहळा अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प, पुष्पक अपार्टमेंट,

सातव चौक, अकोला येथे १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पार पडला.

चि. विराज गव्हाळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या

हस्ते सायकल वाटप करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे नरेंद्रजी देशपांडे उपस्थित होते.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमास दिलीपकाका देशपांडे, अँड. सुनिल काटे,

अँड. लक्ष्मीकांत अंबारखाने, मनोहरराव बनसोड, प्रकाश जोशी, राजेंद्र गुणल्लवार,

अजय शास्त्री, नितीन गव्हाळे, विजय वाघ, नरेंद्र परदेशी, निलेश पवार, भास्करराव बैतवार,

बाळासाहेब दांडेकर, राम उमरेकर, सुनिल देशपांडे, गणेश मैराळ, निलेश दुधलम,

आशु यादव आणि मोहन काजळे यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे संचालन जयंतराव सरदेशपांडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. स्नेहा गोखले व सौ. रश्मी देव यांनी व्यक्त केले.

समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

‘डोनेट युवर सायकल’ उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे समाजात सामाजिक

बांधिलकीचे उदाहरण निर्माण झाले आहे. भविष्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांना मदत करण्याचा

उद्देश या उपक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Click here for more updates : https://ajinkyabharat.com/jai-shivaji-jai-bharat-padayatra/

Related News