अकोला | प्रतिनिधी
श्रावण महिन्यात अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज यांना जलाभिषेकासाठी गांधीग्राम
येथील पूर्णा नदीवरून जल नेण्यासाठी हजारो शिवभक्तांची यात्रा दरवर्षी आयोजित होते.
Related News
‘Thank You India’ म्हणत Emmanuel Macron यांचा व्हिडिओ व्हायरल : मॅक्रॉन यांचा भारत दौरा; ‘धुरंधर’ गाण्याने व्यक्त केला खास आभार संदेश
जळगाव : भारताच्या केळी साम्राज्याची खरी राजधानी
धक्कादायक खुलासा! Pawan Singh शोच्या नावावर 14 लाखांची मोठी फसवणूक
‘कमी खाऊ नका, योग्य खा’ – PCOS साठी न्यूट्रिशनिस्टचा महत्त्वाचा सल्ला
TRP रेस आठवडा 6: KSBKBT 2 ची जबरदस्त पुनरागमन, Anupamaa ला मोठा धक्का – टॉप 10 यादी जाहीर
‘The 50’ चा थरारक शेवट: शिव ठाकरे विजेता ठरला? अधिकृत घोषणा २२ मार्चला!
Bigg Boss Marathi 6 : तन्वी-प्रभूच्या मैत्रीत तणाव, राखीने घरात लावली काडी!
नागपुरात सोमवारी राहुल गिरींचे ‘शिव व्याख्यान’; छत्रपतींच्या शौर्याची गाथा साक्षात अनुभवता येणार
यंदाही 28 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत असल्याने, यात्रेपूर्वी गांधीग्राम घाट परिसरातील सुरक्षा व व्यवस्थापनाचा
आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सकाळी 10 वाजता भेट दिली.
या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे,
उपविभागीय पोलीस अधिकारी, दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी,
तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आरोग्य विभाग,
ग्रामपंचायत अधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाहणीदरम्यान घाटावर बॅरिकेडिंग, रस्त्यांची स्वच्छता, पथदिवे, वाहतुकीची सोय,
जलस्तराची स्थिती याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शिवभक्तांना
कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असल्याची ग्वाहीही यावेळी देण्यात आली.
