फॉर्ममध्ये असाल, तर तिन्ही फॉरमॅट खेळा-गंभीर

भारताचा

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले आहे.

गंभीरचे भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान राहिले आहे,

Related News

आता तो वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

त्याने प्रशिक्षकाच्या भूमिकेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

त्याने म्हटले आहे की जर खेळाडू चांगली कामगिरी करत असेल,

तर त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळावे.

यातून त्याने अप्रत्यक्षरित्या खेळाडूंना चांगली कामगिरी करत असाल,

तर तिन्ही फॉरमॅट खेळायला मिळतील,

असा इशाराही दिल्याचे दिसून येत आहे.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गंभीर म्हणाला,

माझा एका गोष्टी प्रचंड विश्वास आहे की जर तुमची चांगली कामगिरी असेल,

तर तुम्ही तिन्ही फॉरमॅट खेळले पाहिजे.

माझा इंज्युरी मॅनेजमेंटवर माझा फार विश्वास नाही,

जर तुम्ही दुखापतग्रस्त झाला, जा आणि त्यातून तंदुरुस्त होऊन या,

इतकं हे साधं आहे. गंभीर पुढे म्हणाला, जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट

खेळत असता आणि तुम्ही चांगली कामगिरी करता,

तेव्हा तुम्ही कोणत्याही अव्वल खेळाडूला विचारा,

त्यांना तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळायचे असते.

त्यांना बाजूला राहून फक्त एका फॉरमॅटमधील गोलंदाज बनायचे नसते.

दुखापती या खेळाडूच्या आयुष्याचा भाग असतो.

जर तुम्ही तिन्ही फॉरमॅट खेळणार असाल, तर तुम्हाला दुखापत होणार,

अशावेळी तुम्ही परत जाऊन तंदुरुस्त होऊन यावं.

Read also: https://ajinkyabharat.com/there-is-no-danger-of-heart-attack-by-walking-ten-thousand-steps-every-day/

Related News