२७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान गावागावात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान

स्वच्छ

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान

२७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

अभियानासाठी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही थीम निश्चित

Related News

करण्यात आली आहे. जिल्ह्यात या अभियानास लोकचळवळ ब

नविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केले

आहे. अभियानांतर्गत १ हजार २०० ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता विषयक

विविध उपक्रम राबविले जातील. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे

औचित्य साधून २ ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा

केला जाणार आहे. स्वच्छता पंधरवाड्याचा शुभारंभ १७ सप्टेंबरला गाव,

तालुका व जिल्हास्तरावर होणार आहे. सफाई मित्र सुरक्षा शिबिर या

उपक्रमाच्या माध्यमातून सफाई मित्रांसाठी एक खिडकी योजना राबविली

जाणार आहे. १९ सप्टेंबरला एक दिवस श्रमदानासाठी हा उपक्रम राबविण्यात

येणार आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणे, कार्यालय, संस्थात्मक इमारती,

व्यावसायिक व बाजारपेठ सार्वजनिक वाहतूक केंद्रे, प्रमुख रस्ते, महामार्ग,

पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानके, धार्मिक, अध्यात्मिक स्थळे, अभयारण्ये,

ऐतिहासिक वास्तु, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, नाले यांची सफाई केली

जाणार आहे. गाव व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने मोहीम

राबवून स्वयंस्फूर्तीने लोकसहभागाच्या माध्यमातून शास्त्रयुक्त पद्धतीने

कचऱ्याचे व्यवस्थापन केले जाणार आहे. स्वच्छतेच्या अनुषंगाने पथनाट्ये,

कलापथक, संगीत, नृत्य प्रकार, संस्कृती दर्शन या माध्यमातून जनजागृती

केल्या जाणार आहे. एकल प्लास्टिक न वापरण्याबाबत नागरिकांना माहिती

दिली जाणार आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/ajit-pawar-does-not-speak-his-own-mind-jayant-patlancha-tola/

Related News