भरधाव मोटारसायकल लोखंडी पोलवर आदळली

भीषण अपघात १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू.

मुर्तिजापूर : जितापूर ते मुर्तिजापूर दरम्यानच्या रेल्वे पटरीजवळ घडलेल्या भीषण अपघातात १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भरधाव मोटारसायकल लोखंडी पोलवर आदळली

फिर्यादी संदेश वामनराव चौरपगार रा. जितापूर नाकट यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज देवीदास खंडारे वय १९, रा. पंचशिल नगर, मुर्तिजापूर हा आपल्या ताब्यातील MH 30 BY 4136 क्रमांकाची टीव्हीएस रायडर मोटारसायकल भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवत असताना रेल्वे ट्रॅकजवळील लोखंडी पोलला धडकला. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

गुन्हा दाखल, तपास सुरू

या प्रकरणी मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात अप नं. 431/25, कलम 106(1), 281 BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास API अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, दाखल अंमलदार म्हणून HC मंगेश घाटे यांनी काम पाहिले.

निष्काळजी वाहनचालना कारणीभूत

प्राथमिक तपासानुसार भरधाव व निष्काळजी वाहनचालवने  हेच या अपघातास कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे तरुणाच्या अकाली मृत्यूने मित्रपरिवार व परिसरात शोककळा पसरली आहे.

read also : https://ajinkyabharat.com/court-complex-cadine-polysanwar-halla-is-a-wound/