राज ठाकरेंकडून मोर्चेबांधणीला सुरुवात!

राज्यातील

राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. विधानसभा

निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. त्यातच आता

सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण

Related News

सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या अॅक्शन मोडवर आले आहेत. आता

मनसेनेही ठाण्यातून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली

आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यातील चार

विधानसभा क्षेत्रातील गणेश मंडळांना भेट देणार आहे. विधानसभेची

निवडणूक येत्या दोन महिन्यात कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे

सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ठाणे हा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने ठाण्याला राजकीयदृष्ट्या

राज्यातच महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची

रणधुमाळी खऱ्या अर्थाने ठाण्यात मोठ्या प्रमाणात उडणार असल्याचे दिसत

आहे. त्यातच स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आतापासूनच मैदानात उतरले

आहेत. तर दुसरीकडे मनसेकडूनही गणेशोत्सवाचे निमित्त साधत विधानसभेच्या

मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त

भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. राज ठाकरे हे आज ठाण्यातील

विविध  गणपती मंडळांना भेट देणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज

ठाण्यात येणार आहेत. यावेळ ते चारही विधानसभा क्षेत्रातील गणेश मंडळांना

भेट देऊन गणरायाचे दर्शन घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी

कार्यकर्त्यांनीही जोरदार तयारी केली आहे. राज ठाकरे गणेश मंडळांना भेट

देऊन ठाण्यातून मोर्चेबांधणीला सुरुवात करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यांनी लाडक्या बहीण योजनेचा आढावा घेण्यासाठी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या

ठाण्यातून सुरुवात केली होती. तर दुसरीकडे मनसेनेही आता विधानसभेसाठी

ठाण्यातून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत

मनसे विरुद्ध शिंदे गट अशी लढत ठाण्यात रंगताना दिसणार आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/bjps-attempt-to-change-history-supriya-sule/

Related News