अकोला : मराठा सेवा मंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नारायणराव शामराव गारोळे यांचे शुक्रवार, १९ जून रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच मराठा सेवा मंडळ, मराठा सेवा संघ तसेच सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली.
नारायणराव गारोळे यांनी अनेक वर्षे मराठा सेवा मंडळ व मराठा सेवा संघाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत संघटनात्मक कार्याला महत्त्वपूर्ण दिशा दिली. माजी उपाध्यक्ष म्हणून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि समाजहिताच्या अनेक उपक्रमांच्या नियोजनात व अंमलबजावणीत मोलाची भूमिका बजावली. त्यांचा शांत, संयमी आणि सर्वसमावेशक स्वभावामुळे समाजातील विविध घटकांमध्ये त्यांना विशेष आदराचे स्थान होते.
त्यांच्या निधनामुळे मराठा सेवा मंडळ व मराठा सेवा संघाचे मोठे आणि भरून न निघणारे नुकसान झाल्याची भावना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. अनेक सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
Related News
Weather Update : देशात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रासाठीही IMDचा इशारा, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
Weather Update : गेल्या काही दि...
Continue reading
हुतात्म्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे : अमित आझाद
चंद्रशेखर आझाद यांचे वंशज अमित आझाद यांचा अकोल्यात सत्कार; स्वातंत्र्यसंग्रामाचा खरा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोच...
Continue reading
शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीर; ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
अकोल्यात कृषिमंत्र्यांचा सत्कार; पंचनामे आणि अहवाल...
Continue reading
शेवगा फाट्यावर तामगाव पोलिसांची मोठी कारवाई; चिल्ड्रन बँकेच्या नोटांनी फसवणूक करणारे ४ आरोपी अटकेत
संग्रामपूर : बनावट नोटांच्या नावाखाली नागरिकांची...
Continue reading
कर्नाटकात जे होऊ शकतं, ते महाराष्ट्रात का नाही? शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
धाराशिवच्या कळंब तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; हेक्टरी ५० हजार ...
Continue reading
भाग्यश्री यांच्या कुटुंबातील वारसाहक्काचा वाद; दत्तक मुलाला संपत्तीत किती अधिकार? कायदा काय सांगतो?
अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन-द...
Continue reading
Lalbaugcha Raja 2026 :लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी; दर्शनाची रांग 10 किलोमीटरपार
Lalbaugcha Raja 2026 : मुंब...
Continue reading
Fresh Fruits: फळे खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी तपासा; चांगली आणि खराब फळे कशी ओळखाल?
Fresh Fruits: फळे आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. डॉक्...
Continue reading
मुंबई कोस्टल रोडवर BMW कारचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, एक गंभीर
मुंबई : मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. मरीन ड्राईव्हहून हाजीअ...
Continue reading
पेट्रोल भरण्यासाठी जाताय? मग खिशात ठेवा कॅश! UPI पेमेंटवर पेट्रोल पंप चालकांचा मोठा इशारा
UPI MDR Charges: पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल ...
Continue reading
‘Hanuman Ansh’ची टीम थेट ‘वर्षा’वर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक, आगामी प्रकल्पांसाठी दिल्या शुभेच्छा
बॉक्स ऑफिसवर सध्या ‘Hanuman Ans...
Continue reading
त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा तसेच मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गारोळे कुटुंबीयांसह संपूर्ण समाजावर दुःखाची छाया पसरली असून, त्यांच्या समाजसेवेची आठवण कायम प्रेरणादायी राहील, अशा भावना व्यक्त होत आहेत.
read also : https://ajinkyabharat.com/omraj-came-out-shocking-after-20-years-nimbals-big-decision-pending/