अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने अकोल्यातील सिव्हिल लाईन रोडवरील GMD
मार्केटमधील दास सर्जिकल या प्रतिष्ठानाच्या विना परवाना गोदामावर धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात सलाईन बॉक्स जप्त केले आहेत.
गोपनीय माहितीच्या आधारे प्रशासनाने या गोदामाची तपासणी केली. यावेळी 1,000 सलाईन बॉक्स आढळून आले.
Related News
अकोट तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठे नुकसान
लोहारा पोलिसांच्या कारवाईत दोन पिस्तुलांसह दोन हिस्ट्रीशीटर अटकेत
‘ऑपरेशन सिंदूर’वर फिल्म घोषणेनंतर वाद; निर्मात्यांकडून माफी
अकोला शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस;
भारत-पाकिस्तान दरम्यान तात्काळ शस्त्रसंधी लागू; संध्याकाळी ५ वाजल्यापासून गोळीबार थांबणार
सर्व यंत्रणांनी सजग राहून सातत्यपूर्ण समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
मिशन सिंदूरमध्ये 300 जवान सरहद्दीवर
भारत-पाकिस्तान सीझफायरवर सहमत? ट्रम्प यांचा मोठा दावा,
भारताचा दहशतवादाविरुद्ध ऐतिहासिक निर्णय;
वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर
ओवैसींचा पाकिस्तानवर घणाघात; ‘हुकूमत तर सोडा
भारताचा पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक अदानी इंटरप्रायजेसकडून लाँच;
एका बॉक्समध्ये 40 सलाईनचा समावेश असून, या सर्व बॉक्सची एकूण किंमत सुमारे 9 लाख रुपये आहे.
दास सर्जिकलने अन्न व औषध प्रशासनाची परवानगी न घेता विना परवाना गोदामात सलाईन बॉक्स साठवले होते.
विशेष म्हणजे या सलाईन बॉक्समधील बहुतांश सलाईन एप्रिल 2025 मध्ये एक्सपायर होणार होती.
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या धडक कारवाईत अंदाजे 9 लाखांच्या वर मुद्देमाल जप्त केला आहे.
FDA च्या या कारवाईमुळे विना परवाना औषध साठवणूक करणाऱ्यांवर वचक बसला आहे.
सदर प्रकरणात दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने सांगितले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also :https://ajinkyabharat.com/tv-actor-yogesh-mahajan-dies-at-the-age-of-44-due-to-cardiac-arrest/