अकोला – अकोला जिल्ह्यातील कासमपूर पळसो गावात काही दिवसांपूर्वी एका
रुग्णामध्ये कॉलराची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र पळसो कासमपूरच्या वैद्यकीय पथकाने तत्काळ
Related News
मेळघाटात पर्यटकांसमोर दीड तास ‘लेडी ऑफ लेक’चा रुबाब; निसर्गप्रेमींच्या आनंदाला पारावर नाही
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
कारवाई करत गावात व्यापक आरोग्य तपासणी व सर्वेक्षण मोहीम राबवली आहे.
गावातील २८६ घरांमध्ये सुमारे १,२०६ ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून,
त्यामध्ये एका व्यक्तीमध्ये कॉलराची पुष्टी झाली आहे.
त्याचबरोबर इतर तीन व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या
प्रमुख डॉ. रूपाली पवार व त्यांच्या पथकाने गावातील १,०८६ घरांचे सर्वेक्षण करून तब्बल ४,९९२ ग्रामस्थांची तपासणी केली.
सुदैवाने या तपासणीत कोणताही नवीन कॉलराचा रुग्ण आढळून आलेला नाही, ही दिलासादायक बाब आहे.
गावात शुद्ध पाणी पुरवठा व जनजागृती मोहीम सुरू
कॉलराचा संसर्ग पाण्याद्वारे पसरतो, याची जाणीव ठेवून गावात वैद्यकीय दृष्ट्या शुद्ध केलेले
पाणी वापरण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
तसेच, स्वच्छतेचे नियम पाळण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
डॉक्टरांकडून दिलासा
डॉ. पवार यांनी सांगितले की, “उपचार सुरू असलेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे आणि
गावात नवीन कोणताही कॉलराचा रुग्ण आढळलेला नाही.
सध्या गावात कोणत्याही प्रकारचा आरोग्याचा धोका नाही.“
ग्रामस्थ अजय प्रधान यांनी आरोग्य विभागाच्या तत्परतेचे कौतुक करत सांगितले,
“आरोग्य कर्मचाऱ्यांनी वेळेवर आणि योग्य ती काळजी घेतल्यामुळे कॉलराचा फैलाव थांबवता आला आहे.“