हिंगोलीत पिकविम्यासाठी शेतकरी आक्रमक, कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या

राज्यात

राज्यात एक रुपयात पिकविमा योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र

दिसत असून राज्यातील शेतकऱ्यांचे पिकविम्याचे अर्ज फेटाळण्यात आल्याने

शेतकरी आक्रमक झाले आहेत.

Related News

गेल्या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक विमा

मोठ्या प्रमाणात भरला खरा पण पावसाचा खंड

आणि नंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे क्लेम करूनही पिकविमा मिळत नसल्याने

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात शेतकरी आक्रमक झाले आहेत.

शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयासमाेर ठिय्या आंदोलन सुरु केले असून

जोपर्यंत पिक विमा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.

पिकविम्याच्या मागणीसाठी सोमवारीही तालुक्यात एक आंदोलन झाले.

यावेळी कार्यालयांची तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळत नसल्याने

संतापलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी हिंगोली शहरातील पिकविमा कंपनीचं कार्यालय फोडलं आहे.

गेल्या वर्षी पावसाचा पडलेला खंड आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.

दरम्यान, या काळात अनेक शेतकऱ्यांनी नुकसान तक्रारीही दिल्या

त्यानंतर शेतकऱ्यांना विमा मंजूरही झाला,

परंतु तो विमा परतावा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी

हिंगोली शहरातील हनुमाननगर भागात असलेल्या पिक विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली आहे .

Read also: https://ajinkyabharat.com/emotional-robot-can-experience-emotions-like-humans/

Related News