फराह खान आणि तिचा भाऊ साजिद खान यांचे बालपण कठीण आर्थिक परिस्थितीत गेले.
परंतु त्यांनी आपल्या कठोर परिश्रमाने कोरियोग्राफर, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून यश मिळवलं.
मात्र हे फार कमी जणांना माहित असेल की त्यांची सावत्र आई देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.
Related News
25 वर्षांहून अधिक वर्षे फराह चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहे. एक कोरियोग्राफर असण्यासोबतच ती एक उत्तम दिग्दर्शिका आणि निर्माती देखील आहे.
बालपण मात्र खूपच कठीण परिस्थितीत
त्यामुळे फराह आणि तिचा भाऊ साजिद खान, ही नावं आज बॉलिवूडमध्ये कोणाला माहित नाहीत असं एकहीजण नाही.
पण त्यांचं बालपण मात्र खूपच कठीण परिस्थितीत गेलं.
‘बिग बॉस’च्या घरात साजिदने सांगितलं होतं की त्याचे वडील, कामरान खान यांचं निधन आर्थिक तंगावस्थेत झालं.
कामरान हे सुरुवातीला स्टंटमन होते आणि नंतर चित्रपट दिग्दर्शकही बनले.
मात्र त्यांची लहानपणी घरची आर्थिक परिस्थिती म्हणावी तेवढी चांगली नव्हती.
फराह आणि साजिद यांच्या वडिलांची दोन लग्न झाली
चित्रपटांमध्ये काम करूनही फराह आणि साजिदला अनेकदा उपासमार सहन करावी लागायची. एका नातेवाईकांकडे राहून त्यांनी आपलं बालपण काढलं.
फराहने अनेक वेळा मुलाखतींमध्ये आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केलं आहे.
फराह- साजिदच्या सावत्र आई होत्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री
मात्र त्यांच्या वडिलांच्या पहिल्या पत्नीबद्दल म्हणजेच फराह आणि साजिदच्या सावत्र आईबद्दल फारसं कोणाला माहित नाही.
दरम्यान त्यांची सावत्र आई प्रसिद्ध देखील बॉलिवूड अभिनेत्री होती. कामरान खान यांच्या पहिल्या पत्नीचं नाव होतं अमिता.
60-70 च्या दशकात त्यांनी बॉलिवूडमध्ये जवळपास 20 वर्षे राज्य केलं. त्यावेळेसच्या त्या टॉपच्या अभिनेत्री होत्या.
शम्मी कपूर, राजेंद्र कुमार अशा अनेक मोठ्या स्टार्ससोबत त्यांनी काम केलं.
‘शिरिन फरहाद’ चित्रपट टर्निंग पॉइंट
1953 साली ‘श्रीचैतन्य महाप्रभु’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर देवानंद स्टारर ‘मुनीम जी’ मध्येही त्या झळकल्या.
त्यानंतर 1956 मध्ये आलेला ‘शिरिन फरहाद’ हा चित्रपट अमिता
यांच्यासाठी त्यांच्या फिल्मी करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरला.
त्यानंतर शम्मी कपूरसोबत केलेल्या ‘तुमसा नहीं देखा’ या चित्रपटाने त्यांना प्रचंड प्रसिद्धी दिली.
त्यानंतर त्यांच्या वाट्याला अनेक हीट चित्रपट येत गेले.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/premanand-maharajanmule-17-year-old-tarunachi-5-thousandunchi-rose/