फडणवीसांचा शरद पवारांना थेट फोन

"आम्हाला तुमचाही पाठिंबा हवाय"

 उपराष्ट्रपती निवडणुकीत राजकीय वर्तुळात हलचल

मुंबई | प्रतिनिधी
उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. एनडीएच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भाजपची इच्छा आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी

काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट फोन करून पाठिंबा मागितल्याची माहिती विश्वसनीय

सूत्रांकडून मिळाली आहे.दरम्यान, काँग्रेस इंडिया आघाडीकडूनही सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर करण्यात

आली आहे. आजच प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी शरद पवार, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह इंडिया

आघाडीचे नेते एकत्र आल्याने निवडणूक लढतीची समीकरणे स्पष्ट झाली आहेत.

फडणवीसांचा विरोधी पक्षांशी संवाद

उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीसांना विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांशी संपर्क साधून पाठिंबा

मिळवण्याचे काम फडणवीस करत आहेत. “उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आम्हाला तुमचाही पाठिंबा हवाय,” असे सांगत त्यांनी पवार-ठाकरे यांच्याशी

संवाद साधला, मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन झाल्याचे वृत्त नाही.

इंडिया आघाडीचा एकजूट संदेश

बी. सुदर्शन रेड्डी यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना इंडिया आघाडीने एकजूट दाखवली. “ही लढाई संविधान आणि लोकशाही बळकटीकरणाची आहे,”

असे ट्विट शरद पवार यांनी केले. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचा पाठिंबा इंडिया आघाडीच्या उमेदवाराला

मिळणार, हे स्पष्ट झाले आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/today-avatan-udya-poa-traditional-rit/