निलंबित ग्रामसेवकाच्या बनावट सह्यांमुळे लाखो रुपयांचा अपहार!

निलंबित

पाणीपुरवठा, रस्ते आणि विकासाच्या कामांवर बोलणाऱ्या आलेगाव ग्रामपंचायतीत सध्या भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका निलंबित ग्रामसेवकाच्या बनावट स्वाक्षऱ्या करून जनसुविधा निधीतून २,१९,००० रुपये गळवण्यात आल्याचा खुलासा झाला आहे.
विशेष म्हणजे, हा व्यवहार त्या काळातच झाला जेव्हा संबंधित ग्रामसेवक पदावरही नव्हते! यामुळे पातूर तालुक्यातील ही ग्रामपंचायत आता भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे का? असा संतप्त प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.

नेमका काय घडलं?

आलेगावच्या तत्कालीन ग्रामसेवकांना ६ ऑक्टोबर २०२५ रोजी निलंबित करण्यात आले होते. त्यांनी ३ डिसेंबर २०२५ रोजी आपला कार्यभार श्री. गणेश जाधव यांच्याकडे सोपवला. त्यावेळी खात्यात ८,०२,१५४ रुपये शिल्लक होती.

पण २२ डिसेंबर २०२५ रोजी—ग्रामसेवक घर बसलेले असतानाच—त्यांच्या बनावट सह्या करून दोन धनादेश (चेक क्र. ००२१ व ००२०) तयार करण्यात आले.

Related News

  • एक धनादेश ३२,६०० रुपये

  • दुसरा धनादेश १,८६,४०० रुपये

ही रक्कम पंकज गजानन घोगरे या खाजगी व्यक्तीच्या खात्यात जमा करण्यात आली.

प्रशासनाचे ‘मौन’ प्रश्नचिन्ह

  • चेकबुक सरपंचांच्या ताब्यात असताना हा व्यवहार कसा झाला?

  • बँकेने स्वाक्षऱ्यांची खातरजमा का केली नाही?

  • बँकेचे अधिकारी या कारभारात सामील होते का?

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, निलंबित व्यक्तीच्या नावाने व्यवहार होणे हे फक्त तांत्रिक चूक नाही, तर जाणीवपूर्वक केलेला फौजदारी गुन्हा आहे.

ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया

ग्रामस्थांचा संयम सुटला आहे “वरिष्ठांकडे तक्रार केली तरी काही होत नाही, उलट भ्रष्टाचाराचे नवीन ‘गिऱ्हाईक’ मिळतात.”त्यांचा आरोप आहे की विकासकामे केवळ कागदावर नाचवली जात आहेत.सीईओ आणि कलेक्टर स्तरावर तक्रारी जाऊनही कारवाई होत नाही.कारवाई न होणे हेच भ्रष्टाचाराचे मूळ कारण असून वरिष्ठ अधिकारीही ‘फिक्सिंग’ मध्ये असल्याचा संशय व्यक्त केला जातो.

पुढील पाऊल

संबंधित निलंबित ग्रामसेवकाने आता थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बीडिओ यांच्याकडे तक्रार केली आहे.
ग्रामस्थांनी चेतावणी दिली आहे की, दोषींवर तातडीने कारवाई झाली नाही, तर ते रस्त्यावर उतरून निषेध करणार आहेत.

“शासनाचा निधी हा जनतेच्या घामाचा पैसा आहे, तो अशा प्रकारे लुबाडणाऱ्यांना जेलमध्ये दाखवणं आवश्यक आहे!” — आलेगावच्या सामान्य नागरिकांची मागणी.

माजी ग्रामसेवक जयस तायडे यांची प्रतिक्रिया

“ग्रामपंचायत आलेगावच्या जनसुविधा फंड खात्यातून माझ्या संमतीशिवाय २,१९,००० रुपये काढले गेले. मी खाते बदललेले नाही आणि या व्यवहाराशी माझा काहीही संबंध नाही. दोषींवर तातडीने कारवाई व्हावी.”

read also : https://ajinkyabharat.com/from-a-five-kilometer-cycle-trip-to-a-five-thousand-kilometer-international-trip-sumedh-motinagres-inspirational-story/

Related News