महाविद्यालयात रेड रिबन क्लबची स्थापना; विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही जनजागृती

रेड रिबन क्लब

प्रतिनिधी : आकाश डोंगरे

बोरगाव मंजू येथील श्री संत गजानन महाराज कला महाविद्यालयात नुकत्याच रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आली. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पूजा सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. रेड रिबन क्लब आणि राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एचआयव्ही जनजागृती कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. रेड रिबन क्लब

कार्यक्रमाची सुरुवात प्रा. डॉ. डी. के. राठोड यांच्या स्वागत शब्दांनी झाली. त्यांनी रेड रिबन क्लब स्थापन करण्यामागील उद्दिष्टे स्पष्ट केली. त्यांच्या भाषणात क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा, सामाजिक जबाबदारी आणि आरोग्यसंबंधी जनजागृती वाढवण्यावर भर देण्यात आला. एचआयव्ही विषयी विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती देताना डॉ. राठोड यांनी या आजाराविषयीच्या गैरसमजांची योग्य प्रकारे माहिती देणे आणि जनजागृतीचा प्रसार करण्याचे महत्त्व सांगितले.

प्राचार्य डॉ. पूजा सपकाळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे गरजेचे असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, महाविद्यालयातील शैक्षणिक प्रगतीसह विद्यार्थ्यांनी समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी सक्रिय सहभाग दाखवावा. तसेच त्यांनी रेड रिबन क्लबद्वारे विद्यार्थ्यांना स्वयंसेवा आणि समाजसुधारकामध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित केले.

Related News

कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, पदवीच्या प्रथम वर्षातील विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. डी. के. राठोड यांनी केले, तर सह-कार्यक्रम अधिकारी प्रा. उमेश गावंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जनजागृतीसाठी विचार व्यक्त केले.

हा कार्यक्रम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एक सकारात्मक पाऊल ठरला असून, रेड रिबन क्लबच्या माध्यमातून पुढील काळात विद्यार्थ्यांना एचआयव्ही, एड्स आणि सामाजिक जबाबदारी याबाबत अधिक मार्गदर्शन व उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच, क्लबच्या स्थापनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा आणि आरोग्यसंबंधी जनजागृतीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

read also : https://ajinkyabharat.com/ganja-smuggling-in-akola-odishahun-anala-and-akolayat-caught-tharar-attal-accused-of-adultery-in-gandhidham-express/

Related News