पंढरपुरात मुख्यालय, ५० कोटींची तरतूद !
महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल.
Related News
या महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील
अधिकारीची व्सवस्थापकिय संचालकपदी नियुक्ती करण्यात येणार आहे.
या मुख्यमंत्री वारकरी महामंडळासाठी ५० कोटींची तरतूद
शासनाकडून करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाच्या दिनांक ११ जुलै २०२४ रोजी झालेल्या बैठकीत
“मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
आज राज्य सरकारकडून याबाबत अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
वारीनिमित्त लाखो वारकरी प्रतिवर्षी पंढरपूर येथे जमतातच,
त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची, शेगाव येथून
संत गजानन महाराज यांची वारी दरवर्षी निघत असते.
तसेच पुढील संतांच्या पालख्या महाराष्ट्रातुन वेगवेगळ्या ठिकाणा वरुन मार्गस्थ होत असतात.
संत तुकाराम महाराज (देहू), संत एकनाथ (पैठण), संत सोपानकाका (सासवड),
संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत नामदेव (पंढरपूर), संत नरहरी सोनार (पंढरपूर),
संत जनार्दनस्वामी (छत्रपती संभाजीनगर), संत जयरामस्वामी (वडगाव),
संत शेकूबोवा (शिरसावडी), संत घाडगेबोवा (कोळे), संत तपकिरीबोवा (चिंचगाव),
संत मच्छिंद्रनाथ (मच्छिंद्रगड), संत रोहिदास (पंढरपूर), संत संताबाई (पंढरपूर),
संत चोखोबा (पंढरपूर), संत चोखोबा बंका (मेहुणपुरा), संत दामाजी (मंगळवेढे),
संत रुकमाबाई (कौंडण्यपूर अमरावती), संत शंकर महाराज (माहुली-अमरावती),
संत गोरखनाथ (शिराळा), या दिंडींबरोबर लाखो भाविक पंढरीच्या मार्गावर असतात.
महाराष्ट्र राज्यातील किर्तनकार व वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरविण्याकरिता
व कल्याणकारी योजना राबविण्याकरीता ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ”
स्थापन करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
या महामंडळामार्फत पुढील योजना लागू करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. .
मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल.
महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची
“व्यवस्थापकीय संचालक” म्हणून नियुक्ती करण्यात येईल.
मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे भागभांडवल रु.५० कोटी इतके असेल.
शेकडो वर्षांपासून पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची पायी दिंडीच्या माध्यमातून
“वारी” करण्याची पवित्र परंपरा महाराष्ट्रात आहे.
सर्व तिर्थक्षेत्रांचा विकास, किर्तनकार व वारकऱ्यांना अन्न, निवारा, सुरक्षा,
वैद्यकीय मदत , विमा कवच, पायाभूत सुविधा इ. सोयी-सुविधा पुरविण्याकरिता
व कल्याणकारी योजना राबविण्याकरीता
“मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/governments-deadline-for-implementation-of-sagesoyya-ends-today/