EPFO चा 7 कोटी सदस्यांना गिफ्ट;

EPFO चा 7 कोटी सदस्यांना गिफ्ट;

देशातील 7 कोटींपेक्षा अधिक कर्मचारी भविष्य निधी (EPFO)

सदस्यांसाठी मोठी आनंददायक बातमी आहे. केंद्र सरकारने वित्तीय

वर्ष 2024-25 साठी पीएफवरील व्याजदर 8.25 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Related News

या निर्णयामुळे करोडो नोकरदार वर्गाला दिलासा मिळाला असून,

गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही त्यांना समान व्याजदराने लाभ मिळणार आहे.

2023-24 या वर्षातही हाच व्याजदर होता. यापूर्वी 2022-23 मध्ये व्याजदर 8.15%

वरून वाढवून 8.25% करण्यात आला होता.

28 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या

अध्यक्षतेखाली झालेल्या EPFO केंद्रीय न्यासी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.

त्यानंतर सरकारने त्याला अधिकृत मंजुरी दिली.

या निर्णयामुळे देशभरातील सुमारे 7 कोटी पीएफ धारकांना थेट फायदा होणार आहे.

EPFO आणि वित्त मंत्रालय यांच्या संयुक्त निर्णयामुळे नोकरदार वर्गात समाधानाची लाट पसरली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/kan-2025-alia-bhattachaya-dresschi-mallika-sheravatchaya-gaunshi-comparison/

Related News