अकोला :- गणरायाचे आगमन समीप आले असून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अकोल्यातील
महिला मूर्तिकार रेवती नीरज भांगे यांनी एक वेगळीच चळवळ हाती घेतली आहे.
लाल मातीपासून साकारलेल्या आकर्षक व सहज विसर्जित होणाऱ्या गणेशमूर्तींद्वारे त्या पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत आहेत.
रेवती भांगे यांनी २०१७ साली बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयातून फाईन आर्ट (डीपीएड) पूर्ण केले.
छंदाला व्यावसायिकतेची जोड देत त्यांनी मूर्तीशिल्पकलेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक चळवळ सुरू केली.
अर्ध्या फुटापासून दोन फुटांपर्यंतच्या लाल मातीच्या मूर्ती त्या विलक्षण तन्मयतेने साकारतात.
शहरातील विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून रेवती भांगे शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा
घेऊन विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीचे प्रशिक्षण देतात.
गेल्या ८ वर्षांपासून त्यांचा हा प्रवास सुरू असून, आतापर्यंत त्यांनी सुमारे ३० हजार ‘लिली’ फुलांच्या बियांचे मोफत वितरण केले आहे.
रेवती भांगे यांचा हा उपक्रम केवळ पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत नाही तर समाजाला पर्यावरण संवर्धनाचे भानही देतो.
Read also : https://ajinkyabharat.com/kurankhedcha-bhumiputra-ankush-rajesh-chavan-jhala-cs/