नॉटिंघम (ENG vs ZIM): तब्बल २२ वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर खेळण्यासाठी आलेल्या
झिम्बाब्वे संघाचा इंग्लंडने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला. टेस्ट क्रिकेट खेळतोय की T20,
असा संभ्रम निर्माण करणारी इंग्लंडची खेळी पाहून सर्व क्रिकेटप्रेमी थक्क झाले.
Related News
कुरणखेड - राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघाताची मालिका सुरूच आहे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत .
असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डाळंबी जवळ आज दुपारी अपघात झाला यामध्ये का...
Continue reading
मुर्तिजापूर | शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर सोमवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.
मागून खाणाऱ्या व बेवारस अवस्थेत वावरत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह थेट बसस्थ...
Continue reading
प्रतिनिधी | आकोलखेड
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर अकोलखेड येथील श्री विठ्ठल मंदिरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
गुण गौरव सोहळा आयोजन समितीतर्फे आयोजित या ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्याच्या ऐतिहासिक आणि १३५ वर्षे जुन्या कच्छी मशीदने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
'कच्छी मशीद अजान ॲप'च्या माध्यमातून अजान आता थेट...
Continue reading
वेस्टर्न कोल लिमिटेड अर्थातच WCL मध्ये नोकरी लाऊन देण्याचा आमिष दाखवून अकोल्यातील 25 बेरोजगार युवक
युवतींची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहेय.
विशेष म्हणजे नोकरी न मिळाल्य...
Continue reading
मुंबईतील हिंदी भाषिकांवरील मारहाणीच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खुले आव्हान दिले ...
Continue reading
अकोट
अकोट तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ व श्री.संत नरसिंग महाराज फार्मर्स प्रोड्यूस कंपनी जळगाव नहाटे
या संस्थांची हमी भावा अंतर्गत शासकिय ज्वारी खरेदी करण्यासाठी सब ...
Continue reading
टाकळी बु
विनोद वसु
शेतकरी सुखी तर देश सुखी शेतकरी देशाचा पोशिंदा असे एकेकाळी म्हटल्या जात होते. परंतु शेतकऱ्यांना शेती
करणे आता अवघड झाले असून ग्रामीण भागातील अनेक ठिकाणचे...
Continue reading
पातुर तालुका प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील सस्ती खेट्री पिंपळखुटा शिरपूर चतारी सायवणी चान्नी सावरगाव उमरा पांगरा सुकळी चांगेफळ आदीसह
तालुक्यातील प्रत्येक गावातील शेत रस्त्यांचे र...
Continue reading
पंढरपूर दिनांक सहा वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व असलेल्या आषाढी महापर्वता
निमित्य 15 लाखांवर विठ्ठल भक्त टाळ मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करत
शनिवारी पंढरीस दाखल झाले इस...
Continue reading
"युतीवर भाष्य नको, आधी माझी परवानगी घ्या" – राज ठाकरे
मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान,
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना...
Continue reading
काल दिनांक 05/07/2025 रोजी
गोपनीय माहितीनुसार सांगळूद येथून बार्शीटाकळी
ला 4 गोवंश कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात
असताना गौरक्षक दलाच्या गौरक्षकांनी पकडून
आरोपींवर एमआयड...
Continue reading
पहिल्या दिवशी इंग्लंडने केवळ ३ विकेट्स गमावून ४९८ धावांचा डोंगर रचत दोन वर्ल्ड रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले.
डकट-क्रॉलीची धडाकेबाज सलामी
टॉस जिंकल्यावर झिम्बाब्वेने इंग्लंडला आधी फलंदाजी दिली आणि तिथेच त्यांच्या अडचणींना सुरुवात झाली.
इंग्लंडच्या सलामीवीरांनी आक्रमक खेळ करत झिम्बाब्वेचा मोर्चा पुरता उध्वस्त केला.
बेन डकटने १३४ चेंडूत १४० धावा केल्या (२ षटकार, २० चौकार) तर झॅक क्रॉलीने १७१
चेंडूत १२४ धावा करत दोघांनी मिळून केवळ ४१.३ षटकांत २३१ धावांची भागीदारी केली.
ही भागीदारी ५.५६ च्या रनरेटने झाली आणि त्यासोबतच त्यांनी एक ऐतिहासिक विक्रम केला —
टेस्ट क्रिकेटमध्ये ५+ रनरेटने दोनदा २००+ ओपनिंग भागीदारी करणारी ही पहिली जोडी ठरली.
ओली पोपचा झंझावात
डकट बाद झाल्यानंतर आलेल्या ओली पोपने अजून वेगात खेळ करत १६३ चेंडूत नाबाद १६९ धावा चोपल्या.
१०३.६८ स्ट्राइक रेटने फलंदाजी करत त्यांनी २४ चौकार व २ षटकार लगावले.
जो रूट केवळ ३४ धावांवर बाद झाला, मात्र हैरी ब्रूकसह पोप डावाच्या अखेरपर्यंत मैदानात टिकून राहिला.
टेस्ट क्रिकेटमध्ये नव्या विक्रमांची नोंद
इंग्लंडने ३ बाद ४९८ धावा करत टेस्ट क्रिकेटमधील पहिल्या दिवशी सर्वात कमी विकेट गमावून सर्वाधिक
धावा करण्याचा जागतिक विक्रम केला. यापूर्वी २०२२ मध्ये पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध ४ बाद ५०६ धावा केल्या होत्या,
मात्र इंग्लंडने यापेक्षा कमी विकेट्समध्ये जवळपास तितकाच स्कोअर करून इतिहास रचला.
इंग्लंडच्या भूमीवरही हा पहिल्या दिवसाचा सर्वाधिक टेस्ट स्कोअर ठरला.
RCBच्या खेळाडूची दुर्दशा
IPL 2025 साठी RCBने निवडलेला झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजारबानी
याच्यासाठी हा सामना फारसा शुभ ठरला नाही. पहिल्या दिवशी त्यांनी २० षटकांत तब्बल १११ धावा दिल्या आणि केवळ १ विकेट मिळवली.
क्रिकेटप्रेमींनी इंग्लंडच्या या आक्रमणाची मजा घेतली असली, तरी झिम्बाब्वेसाठी हा सामना
‘दुःस्वप्न’ ठरतोय. टेस्ट क्रिकेटमध्ये T20चा कहर पुन्हा एकदा पाहायला मिळालाय!
Read Also : https://ajinkyabharat.com/vadhi-vare-musadhar-paus-aani-red-alert/