जनता भाजी बाजारातील अतिक्रमण ठरत आहे डोकेदुखीभाजीपाला खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सोसावा लागतोय नाहक त्रास

अतिक्रमण

अकोला शहरातील मुख्य रस्त्यालगत टॉवर चौकाजवळ महात्मा फुले

जनता भाजी बाजार आहे. या बाजारात शहर भरातील आणि शहरालगातचे लोकं

Related News

ताजा भाजीपाला खरेदी करण्यासाठी येतात.

त्यामुळे सकाळी ग्राहकांची जास्त गर्दी असते.

आणि दिवसभर बाजार खरेदी करणाऱ्यांची गर्दी असतेच त्यामुळे नेहमीसाठीचे

गर्दीचे ठिकाण म्हणून या बाजाराकडे पाहले जाते. त्यामुळे येथे भामटे चोरांची

गर्दी असतेच. त्यात भर घालण्यासाठी स्थानिक दुकानदारांना मंजूर केलेल्या

जागे व्यतिरिक्त जागा व्यापलेली असते. तर किरकोळ

दुकानदार परवानाधारक दुकानाच्या समोरच आपली दुकानें थाटत

असल्याने असलेला रस्ता अरुंद होतो. महात्मा फुले जनता भाजी बाजारातील अतिक्रमण

डोकेदुखी ठरत आहे. या अतिक्रमण मुळे भाजीपाला खरेदी करणाऱ्या ग्राहकांना

नाहक त्रास सोसावा लागत आहे.

Read Also https://ajinkyabharat.com/life-threatening-attack-on-petrol-pump-operator/

Related News