एल्फिन्स्टन पुलाच्या मार्गातील अडथळा दूर;…..

एल्फिन्स्टन पुलाच्या मार्गातील अडथळा दूर; १९ इमारतींच्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय

मुंबई :

वरळी-शिवडी प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला स्थानिक रहिवाशांनी

“आधी पुनर्वसन, मगच रस्ता बंद” असा ठाम आग्रह धरला होता.

Related News

मात्र, आता हा अडथळा दूर झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री आशिष

शेलार यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयानुसार, एमएमआरडीए त्या ठिकाणीच सर्व १९ इमारतींचे पुनर्वसन करणार आहे.

या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव, एमएमआरडीए, मुंबई महापालिका व एमएसआरडीसीचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

मंत्री आशिष शेलार यांनी रहिवाशांचा मुद्दा ठामपणे मांडून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आणि अखेर सकारात्मक तोडगा काढण्यात यश आले.

Read Also : https://ajinkyabharat.com/pranayat-durchaivi/

Related News