एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….

एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या....

जालना: एका महिन्याच्या चिमुरड्या मुलीला विहिरीत फेकणाऱ्या आई-वडिलांना अटक

जालना जिल्ह्यातील चंदनझिरा येथे माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.

अवघ्या एका महिन्याच्या चिमुरड्या मुलीला तिच्याच आई-वडिलांनी

विहिरीत फेकून निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Related News

ही घटना १२ एप्रिल रोजी समोर आली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या तपासातून या

प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. सीसीटीव्हीमध्ये आरोपी आई-वडिलांनी

आपल्या निष्पाप बाळाला विहिरीत फेकताना दिसून आले आहे.

चंदनझिरा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या निर्दयी माता-पित्यांना अटक केली आहे.

या प्रकरणी दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, समाजात संतापाची लाट उसळली आहे.

एका निष्पाप जीवावर त्याच्या जन्मदात्यांनीच असा अत्याचार करणे, हे अतिशय निंदनीय आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/chand-sendanchi-missed-ayushy-samalam/

Related News