आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे

आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे

फाळेगाव येथे तथागत गौतम बुद्ध मूर्तीची स्थापना.

मंगरूळपीर : आपल्या समाजातील कार्यक्षम भगिनी व बांधवांनी उद्योग क्षेत्रामध्ये आले पाहिजे,

आम्ही डिक्की या दलित उद्योजक संघटनेमार्फत अनेकांना उद्योग सुरू करण्याकरिता आर्थिक मदत दिलेली आहे.

Related News

आपली आर्थिक सुबत्ता असेल तरच आपण इतर समाजाशी स्पर्धा करू शकतो

आणि आपला सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकास घडवून आणू शकतो .

असे प्रतिपादन मुंबई स्थित प्रसिद्ध उद्योजक व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते डॉ. सुगत वाघमारे यांनी

फाळेगाव येथे तथागत गौतम बुद्ध मूर्तीची स्थापना कार्यक्रमाचे निमित्ताने केले.

व्हिएतनाम भिक्कुसंघ व फाम फु तन्ह यांनी फाळेगाव येथील पंचशील बहुउद्देशीय संस्था व महिला

समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिएतनाम येथील पूजनीय भन्ते फाम फु तन्ह व व्हिएतनाम

भिक्खू विद्यार्थी संघ यांनी दान दिलेल्या बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली.

आशीर्वाद मुद्रा असलेली अत्यंत रेखीव अशी आकर्षक मूर्ती प्राध्यापक रवींद्र इंगोले यांनी दान दिली.

यावेळी आमदार श्यामभाऊ खोडे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित असलेल्या उपासक उपासिकांना

आश्वासित केले की फाळेगाव या गावाला योग्य त्या सोयी उपलब्ध करून देईल.

डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी बुद्ध धम्मा मध्ये पंचशीलाचे महत्व विशद केले.

त्याप्रमाणे आपण संस्कारीत व्हावे असे सुचविले. बुद्ध धम्माच्या तत्वांचे

आचरण केले तर निश्चितच आपला सर्वांगीण विकास होतो आवर्जून सांगितले.

यावेळी प्राचार्य डॉक्टर विठ्ठल खाडे , सरपंच जनार्दन इंगोले यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

सूत्रसंचालन प्रा. खाडे यांनी केले. बुद्ध मूर्ती स्थापनेच्या कार्यक्रम दोन हजारापेक्षा जास्त उपासक उपासिकांच्या उपस्थितीत पार पडला.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अनिल मनवर, बबन इंगोले, दिगंबर इंगोले, प्रीतम बडवे, सुनील इंगोले,

रमेश मनवर, पंकज कांबळे अरविंद भगत विजय बडवे सुमेध बडवे अरविंद इंगोले (माजी सरपंच),

भगवान मनवर किसन मनवर प्रीतम परसराम बडवे मनीष मनवर इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

दैनिक अजिंक्य भारत चे संचालक श्रीकांत पिंजरकर , सुधीर गहूले , उत्तमराव इंगोले ,

शंकर तायडे , संजय अमृता भगत, डॉ. गजेंद्र बेलखेडे डॉ. हरिभाऊ इंगोले

आणि अरविंद भगत छायाचित्रकार डोंगरे यांचा सन्मान करण्यात आला.

बॉक्स घेणे

फाळेगाव येथे बुद्ध विहार बांधण्याकरिता व विहाराची देखभालिकरीता आर्थिक

तरतूद आवश्यक असल्याचे गावकऱ्यांनी यावेळी डॉ . सुगत वाघमारे यांना सांगितले.

यावेळी डॉ वाघमारे यांनी समाज बांधव यांच्या विनंतीला मान देऊन लगेच

बुद्ध विहारसाठी एक लाख रुपयाची देणगी जाहीर केली. डॉ वाघमारे यांनी केलेले सामाजिक

कार्य हे आमच्या हृदयाला स्पर्श करून गेले अशा प्रतिक्रिया उपस्थित समज बांधवांकडून व्यक्त झाल्या.

Read Also : https://ajinkyabharat.com/blue-origin-history-ketie-perisah-4-mahilancha-yashaswi-antara/

Related News