शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमांतर्गत सभा संपन्न ;डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा उपक्रम

तेलबिया संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा उपक्रम

तेलबिया संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा उपक्रम

अकोला : शाश्वत आणि फायदेशीर शेतीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या

तेलबिया संशोधन विभागातर्फे बार्शीटाकळी तालुक्यातील जलालाबाद व वाघजई येथे शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद सभा घेण्यात आली.

Related News

७ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या या सभेला विदर्भातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ डॉ. संतोष गहुकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या चर्चेत सोयाबीन व तूर पिकांवरील

कीड-रोग व्यवस्थापन, कपाशी पिकाचे खत व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

पीक स्पर्धेत सहभागी प्रयोगशील शेतकरी अरविंद शेंडे यांनी कमी कालावधीत येणारे आधुनिक पद्धतीने लागवड केलेले सोयाबीन पीक दाखवले.

याच दरम्यान पारंपारिक पद्धतीने पेरलेल्या सोयाबीन पिकाशी तुलना करून फरक शेतकऱ्यांना दाखवण्यात आला.

तसेच गजानन शेंडे यांच्या शेतात चुकीचे तणनाशक फवारणीमुळे तुरीवर झालेल्या प्रतिकूल परिणामाचा आढावा घेऊन शास्त्रज्ञांनी उपाययोजना सुचविल्या.

सभेला डॉ. प्रशांत माने (कीटक शास्त्रज्ञ), डॉ. भरत फरकाडे (शास्त्रज्ञ कृषी विद्यावेत्ता), डॉ. मंजुषा गायकवाड (वनस्पती रोग शास्त्रज्ञ) यांसह स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमातून पीक व्यवस्थापनातील आधुनिक तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश साधला गेला.

Read also :https://ajinkyabharat.com/nashikamadhil-bekayadesh-call-center-racketcha-bhandafod-5-janna-stuck/

Related News