डोनाल्ड ट्रम्प अधिकृत उमेदवार म्हणून आज औपचारिकपणे नामांकन स्वीकारतील!

अमेरिकेचे

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर

रविवारी पेनसिल्व्हेनिया राज्यात गोळीबार झाला.

ते या हल्लयातून थोडक्यात बचावले. हल्ल्यानंतर प्रथमच दि. १६ जुलै रोजी

Related News

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते सहभागी झाले.

डोनाल्ड ट्रम्प यांची अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे.

तिसऱ्यांदा त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून उमेदवारी देण्यात आली आहे.

रिपब्लिकन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये कानाला पट्टी बांधून ते सहभागी झाले.

या वेळी ट्रम्प मैदानात आले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.

यावेळी ली ग्रीनवुडने त्यांचे गॉड ब्लेस द यू.एस.ए. केले. हे गीत गायले.

ट्रम्प यांची मुले एरिक ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरर हेही यावेळी उपस्थत होते.

अधिवेशनाच्या ठिकाणी हजारो सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये प्रतिनिधींची मते मिळवल्यानंतर

प्रतिनिधींनी डोनाल्ड ट्रम्प यांना पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून औपचारिकपणे नामनिर्देशित केले

त्यांनी नामांकनानंतर तेथे उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले नाही,

ते अधिकृत उमेदवार म्हणून आज १८ जुलै रोजी मिलवॉकी येथे औपचारिकपणे नामांकन स्वीकारतील.

यावेळी ते भाषण देखील करणार आहेत.

अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहे.

ट्रम्प यांना पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा नामांकन देण्यात आले आहे.

ट्रम्प यांना दिलेला धोका लक्षात घेऊन अधिवेशनाच्या ठिकाणी हजारो सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/bjp-mp-anup-dhotres-election-appeal-in-high-court/

Related News