पातुर नंदापूर: अलीकडे पातुर नंदापूर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अनुषंगाने कृषी खाते व महसूल विभागने तातडीने शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी व पंचनामे सुरू केली होती.या पंचनाम्यांच्या आधारावर अंदाजे 80% शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे आढळले. त्यामुळे आज, दि. 25 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय पातुर नंदापूर येथे सरपंच सचिन लाखे, तलाठी एस पी कथलकर, निलेश देवडे, विजू पुंडे आणि अनेक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मदतीची यादी प्रसिद्ध करण्यात आली.
शासनाने जाहीर केलेली मदत: हेक्टरीनुसार मदत: 8,500 रुपये, 2 हेक्टरपर्यंत मर्यादा ,सरासरी 1 एकरावर सुमारे 3,400 रुपये मदत
पंचनाम्यातील 80% नुकसान दर्शविल्यानंतरही शेतकऱ्यांचा विचार करता शासनाची मदत कमकुवत ठरत आहे. अलीकडे झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपये खर्च केलेल्या शेतीतील उत्पादन बुडाले आहे. शेतकऱ्यांचा अनुभव असे की, सणासुदीच्या दिवसांतही शासनाने दिलेली मदत अत्यंत कमी आहे. शेतकऱ्यांना धान्य खरेदीसाठीही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. दिवाळीच्या सणापूर्वी शेतकऱ्यांच्या घरांमध्ये दुःखाचे सावट असल्याचे चित्र दिसत आहे.
शेतकऱ्यांच्या चिंता:
उसनवारी करून शेतीसाठी पैसा जमा करणे
कुटुंबाची आर्थिक व्यवस्था
मुलीच्या लग्नाचा खर्च
मुलांच्या शाळेचा खर्च
शेतकरी मागणी करतात की, शासनाने विचारपूर्वक अधिक मदत द्यावी, जेणेकरून त्यांच्या कुटुंबाचे जीवन निर्वाह होऊ शकेल.विकास ठाकरे यांच्या अहवालानुसार, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी हवालदिल झाला असून, या संकटावर तत्पर उपाययोजना आवश्यक आहे.
READ ALSO:https://ajinkyabharat.com/khamgavamadhye-mahilansathi-special-arogya-shibir/
