जिल्हा परिषदेच्या एका शाळेत पाच मुलींचा विनयभंग करण्यात
आला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्या
शिक्षकांकडे पालक आपल्या मुलांना सोडून बिनधास्त राहतात,
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
ज्या शिक्षकाला गुरु म्हटले जाते, त्यानेच हा प्रकार केला.
शिक्षकाने केलेल्या या प्रकारानंतर मुली रडत रडत घरी आल्या अन्
काय घडले ते पालकांना सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील या
घटनेनंतर पुन्हा समस्त पालकवर्ग चिंतत आला आहे. बाळशीराम
यशवंतराव बांबळे असे त्या शिक्षकाचे नाव आहे. अहमदनगर
जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात खराडी जिल्हा परिषद शाळेत
तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींशी बाळशीराम यशवंतराव
बांबळे या शिक्षकाने असभ्य वर्तन केले. दुपारच्या सुट्टीत एक
मुलगी रडत रडत घरी गेली. तिने घडलेला प्रकार पालकांना
सांगितला. या प्रकारे इतर चार ते पाच मुलींबरोबरही बाळशीराम
बांबळे या शिक्षकाने असभ्य वर्तन केले होते. मुख्यध्यापकांनी त्या
सर्व मुलींना बोलवून चौकशी केली. त्यांनी त्या शिक्षकाच्या
कारनाम्याचा पाढा वाचला. त्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल केला. वर्गशिक्षक बाळशीराम यशवंतराव बांबळे हे
शाळेत नव्याने रूजू झाले. ते शाळेत आल्यापासून असे प्रकार करत
आहेत. याबाबत मुलींच्या पालकांनी दिलेल्या तक्रारी उल्लेख
करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी पीडित अल्पवयीन
मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून
पोलिसांनी शाळेतील या शिक्षकाविरुद्ध बीएनएस कलम ७४,७५,
बालकांचे लैंगिक अत्याचार कलम ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र
देशमुख करत आहेत.