‘कल्कि 2898 AD’ च्या नव्या ट्रेलरची चर्चा!

युद्धात

युद्धात झालेला अश्वत्थामाचा पराभव अन् नव्या साम्राज्याचा उदय..

‘कल्की 2898 AD’ सिनेमाची उत्सुकता सध्या शिगेला आहे.

Related News

या सिनेमात अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हसन आणि प्रभास यांची प्रमुख भूमिका आहे.

काहीच दिवसांपुर्वी सिनेमाचा मुख्य ट्रेलर लोकांच्या भेटीला आला होता.

नुकतंच ‘कल्की 2898 AD’ चा नवीन ट्रेलर रिलीज करण्यात आलाय.

या ट्रेलरमध्ये आजवर कधीही न पाहिलेल्या अद्भुत दुनियेचा अनुभव घेता येतोय.

नव्या ट्रेलरमध्ये मुख्य कलाकार लार्जर देंन लाईफ अवतारात दिसत आहेत.

मेगास्टार अमिताभ बच्चन ‘अश्वत्थामा’ बनून स्टंट करताना दिसत आहेत.

तर कमल हासन ‘यास्किन’च्या रूपात ओळखता न येणाऱ्या प्राणघातक अवतारात दिसत आहेत.

सुपरस्टार प्रभास ‘भैरवा’च्या भूमिकेत लक्ष वेधून घेतोय.

दीपिका पदुकोणने ‘सुमती’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे.

याशिवाय दिशा पटानी ‘रॉक्सी’च्या भूमिकेत मन जिंकतेय

ट्रेलरमध्ये ‘कल्की 2898 AD’ च्या तीन वेगळ्या जगाची ओळख करून दिली आहे.

जगण्यासाठी संघर्ष करत असलेले शेवटचे शहर म्हणून काशी आपल्याला पाहायला मिळत आहे.

याशिवाय ‘नंदनवन’ आणि छळलेल्यांसाठी आश्रय म्हणून काम करणारी

एक गूढ जमीन ‘शंबाला’ या तीन जागा दिसत आहेत.

उत्कृष्ट संगीत, उत्कृष्ट VFX आणि चित्तथरारक व्हिज्युअल्ससह

हा सिनेमा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महत्त्वाकांक्षी सिनेमा ठरण्याची शक्यता आहे.

‘कल्की 2898 एडी’ मध्ये दिग्दर्शक नाग अश्विनचा दूरदर्शी दृष्टीकोन

भारतीय सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम करेल.

ट्रेलरमध्ये महाभारताचा संदर्भ हा एक उत्कृष्ट क्षण आहे.

जो पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात.

नाग अश्विन दिग्दर्शित आणि वैजयंती मूव्हीज निर्मित हा बहुभाषिक पौराणिक कथेवर प्रेरित असलेला

साय-फाय सिनेमा २७ जून २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/dont-ignore-mood-swings/

Related News