शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन

शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन

पातूर:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवा नेतृत्व सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत कार्यरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

मुंबई येथील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव मोहम्मद फरहान अमीन

Related News

यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री मा. हसन मुश्रीफ यांची सदिच्छा भेट घेऊन विविध शैक्षणिक प्रश्न मांडले.

या बैठकीत विना-अनुदानित आयुर्वेद महाविद्यालयांतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व छात्रवृत्ती मिळावी,

या मुख्य मागणीसह जातीचे प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल घटकांना सहाय्य व उच्च शिक्षणातील सुलभ प्रक्रिया यावर विस्तृत चर्चा झाली.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आश्वासन दिलं की

“राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. या शिष्यवृत्तीबाबत योग्य पावलं उचलली जातील.

विद्यार्थ्यांचे हक्क अबाधित राहतील.”

फरहान अमीन यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रयत्न म्हणजे पक्षाच्या शिक्षणनिष्ठ धोरणांचे उत्तम उदाहरण असून,

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत पक्ष किती संवेदनशील आहे हे अधोरेखित होते.

या संवादामुळे राज्यातील हजारो आयुर्वेद विद्यार्थी आणि पालकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/police-superintendent-ma-arch-chandak-yanchaya-hastay-vidyarthaninch-gaurav/

Related News