दिव्यांग व वयोवृद्ध मतदार घरूनच करू शकतील मतदान

२० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी

निवडणूक आयोगाने दिव्यांग व ८५ वर्षापेक्षा जास्त वयोवृद्ध

मतदारांना घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून

Related News

दिली आहे. मात्र त्यासाठी त्यांना आवश्यक कागदपत्रांसह संबंधीत

मतदान केंद्रस्तरीय कधिकार्या मार्फत निवडणूक निर्णय अधिकारी

यांचे कडे अर्ज सादर करावा लागणार आहे. निवडणूक आयोगाने

ज्या मतदाराची ४०% पेक्षा अधिक अपंगत्व असल्यामुळे मतदार

यादीत दिव्यांग म्हणून नोंद करण्यात आली आहे. तसेच ज्या

व्यक्तीला बेंचमार्क अपंगत्व आलेले आहे अशा मतदारांना अपंगत्व

प्रमाणपत्र सादर करून, त्याचप्रमाणे ८५ वर्षापेक्षा अधिक वय

असलेले मतदार जे मतदान केंद्रापर्यंत स्वतः जाऊ शकत नाही,

अशा मतदारांना टपाली मतपत्रिकेची सुविधा भारत निवडणूक

आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे. वरील प्रकारच्या

मतदारांपैकी ज्या मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान

करावयाचे आहे त्यांनी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या

दिनांक पासून पुढील पाच दिवसांपर्यंत विहित नमुना १२ ड मधील

अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित मतदान केंद्रस्तरीय

अधिकार्या मार्फत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर

करणे बंधनकारक आहे. दिनांक २२ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर

च्या दरम्यान नमुना १२ ड मधील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह या

संबंधित मतदारांना सादर करायचा आहे. त्यानंतर निवडणूक

निर्णय अधिकाऱ्यांनी नेमलेले बी एल ओ यांनी घरोघरी जाऊन

बारा डी नमुना फॉर्म चे वाटप केले आहे. ३०अकोला पश्चिम

मतदारसंघात या पद्धतीने फॉर्मचे वाटप करण्यात आले असून,

दिव्यांग व ८५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना शोधून

त्यांच्याकडे हे फॉर्म पोचवले जात आहेत. २७ ऑक्टोबर पर्यंत हे

फॉर्म आवश्यक कागदपत्रासह भरून निवडणूक निर्णय अधिकारी

३० अकोला पश्चिम यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन

निवडणूक निर्णय अधिकारी अनिता भालेराव यांनी केले आहे.

मतदानाचा हक्क बजावताना अगदी वयोमानामुळे किंवा अपंगत्व

मुळे कुणीही मतदानापासून वंचित राहू नये म्हणून निवडणूक

आयोगाने अपंग व वयोवृद्धांच्या मतदानासाठी सुद्धा व्यवस्था

केलेली आहे. आणि त्याकरिता प्रशासन सुद्धा योग्य तो प्रचार व

प्रसार करत असून, मतदारांना कशाची अडचण आल्यास एक

हेल्पलाइन नंबर सुद्धा २४ तासासाठी उपलब्ध करून दिल्या गेलेला

आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/fast-political-action-in-jharkhand/

Related News