बुलडाणा जिल्ह्यातून पंढरपूर येथील आषाढी यात्रा वारीसाठी जाणाऱ्या
हजारो भाविकांसाठी यंदा एसटी महामंडळाने सुसज्ज आयोजन केले आहे.
Related News
यंदा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बुलढाणा विभागातर्फे
आषाढी साठी तब्बल दोनशे वीस विशेष बस गाड्या (यात्रा स्पेशल)
सोडण्यात येणार आहे.
बुलढाण्याचे विभाग नियंत्रक आणि यंत्र अभियंता
तथा प्रभारी विभागीय वाहतूक अधिकारी नितीन जयस्वाल
यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा आषाढी यात्रेसाठी
सुसज्ज नियोजन करण्यात आले आहे
नियोजनात वाहतूक विभागाचे सुधीर भालेराव,
हरीश नागरे यांचाही सहभाग होता.
बुलढाणा विभागातील जिल्ह्यातील सात एसटी बस आगार मधून
या विशेष बस गाड्या सोडण्यात येणार आहे.
विभागाचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा येथील बस आगार मधून
सर्वाधिक म्हणजे त्रेचाळीस बस सोडण्यात येणार आहे.
या खालोखाल खामगाव आगारातून चाळीस बस
मेहकर आगारातून अडोतीस बस,
मलकापूर आगारातून एकोनतीस, चिखली मधून एकवीस बस सोडण्यात येणार आहेत.
जळगाव जामोद आगारातून अड्डठ्ठावीस
तर शेगाव मधून चौदा यात्रा विशेष सोडण्यात येणार आहे.
या सात बस आगार अंतर्गत लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा,
बुलढाणा, चिखली, खामगाव, जळगाव, मलकापूर,
मेहकर येथून या बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
बुलढाणा विभागातून जाणाऱ्या बसचा मुक्काम भीमा यात्रा स्थानक
या तात्पुरत्या बस स्थानक येथे राहणार आहे.
तिथे ते सोलापूर विभाग नियंत्रकाच्या मार्गदर्शनामध्ये यात्रा ते वाखरी,
रींगण सोहळा,शटल सेवा पुरविणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/deputy-chief-minister-ajit-pawars-wife-in-laws-partner/