‘धर्मवीर 2’ ची नवी रीलीज डेट जाहीर!

धर्मवीर

27 सप्टेंबरला सिनेमा होणार प्रदर्शित

आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘धर्मवीर 2’ सिनेमाची आता

नवी रीलीज डेट जाहीर झाली आहे. पूर्वी 9 ऑगस्टला रीलीज होणारा

Related News

हा सिनेमा आता 27 सप्टेंबरला रीलीज होणार आहे. धर्मवीर च्या

पहिल्या भागाला रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर

आता दुसर्‍या भागाची प्रतिक्षा आहे. प्रविण तरडे दिग्दर्शित हा सिनेमा

मागील महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थितीमुळे

आणि जोरदार पावसामुळे लांबणीवर टाकण्यात आला होता.

आज स्वातंत्र्यदिनी सिनेमाची नवी रीलीज डेट समोर आली आहे.

हा चित्रपट आता २७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

धर्मवीर २ चित्रपटाची सर्वाना उत्सुकता लागली आहे.

धर्मवीर च्या दुसऱ्या भागात काय असेल हे आता सप्टेंबर मध्ये कळणार आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/independence-day-speech-important-comment-by-prime-minister-modi-on-one-nation-one-election/

Related News