धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा घटनाक्रम: मुख्यमंत्र्यांच्या ठाम भूमिकेमुळे अखेर निर्णय

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा घटनाक्रम: मुख्यमंत्र्यांच्या ठाम भूमिकेमुळे अखेर निर्णय

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर आणि या घटनेचे

व्हायरल झालेले फोटो व व्हिडीओ पाहून राज्यभरात संतापाची लाट उसळली.

या घटनेत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा संबंध आल्याचे आरोप सातत्याने होत होते.

Related News

परिणामी, सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते.

काय घडले होते?

  • १० डिसेंबर २०२४: संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या. त्याआधी ९ डिसेंबर रोजी त्यांचे अपहरण झाले होते.
  • विधीमंडळात भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाचा उल्लेख करत ‘आका’ आणि ‘आका’ का आका असा उल्लेख केला, ज्यावरून अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात होते.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कडक भूमिका: त्यांनी याप्रकरणी धनंजय मुंडे यांना अनेकदा समजावून सांगितले. तसेच, अजित पवार यांच्यासोबतही तीन-चार वेळा चर्चा केली.
  • धनंजय मुंडे सुरुवातीला राजीनामा द्यायला तयार नव्हते.
  • अखेर, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र लिहून मुंडेंना मंत्रिमंडळातून काढण्याचा इशारा दिला.
  • काल रात्री फडणवीस यांनी पुन्हा मुंडेंना उद्याच्या उद्या राजीनामा द्या असे स्पष्टपणे सांगितले.
  • आज सकाळी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या हाती आला.

मुख्यमंत्र्यांची ठाम भूमिका आणि राजकीय परिणाम

  • फडणवीस यांनी या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा पहिल्याच सभेत दिला होता, तो अखेर खरा ठरला.
  • धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाची प्रतिक्रिया महत्वाची ठरणार आहे.
  • राज्यभर मुंडेंच्या राजीनाम्यानंतर वेगवेगळ्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.

हे प्रकरण केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिकदृष्ट्याही मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकणारे ठरले आहे.

Read more news here :https://ajinkyabharat.com/patur-talukyati-shweta-inglene-abacus-mathematics-examination/

Related News