धगधगत्या ट्रकनं हादरला महामार्ग, उसळला हाहाकार!

धगधगत्या ट्रकनं हादरला महामार्ग, उसळला हाहाकार!

नवसाळ फाट्याजवळ भीषण आग; गट्टू व ट्रक खाक, प्रशासनाची झोप उडाली

मूर्तिजापूर – अमरावतीहून नाशिककडे निघालेला गट्टू भरलेला ट्रक गुरुवारी रात्री ३

वाजता नवसाळ फाट्यानजीक अचानक पेटल्याने राष्ट्रीय महामार्गावर भीषण दृश्य निर्माण झाले.

Related News

धगधगत्या आगीमुळे संपूर्ण महामार्ग हादरून गेला, अन् परिसरात एकच हाहाकार माजला!

इंजिनातून लागलेल्या आगीत काही क्षणांतच ट्रक जळून खाक झाला. अंदाजे ३ लाखांचे गट्टू

आणि २० लाखांचा ट्रक या आगीत भस्मसात झाला. ट्रकमधून उठलेल्या धुराच्या लोटांमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अग्निशामक दल वेळेवर पोहोचलेच नाही! यामुळे आग अधिक भडकली

आणि मोठे नुकसान टाळता आले नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणावर स्थानिकांनी संताप व्यक्त केला.

माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश महाजन व पथकाने

घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या प्रयत्नाने आग अखेर आटोक्यात आणण्यात आली.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ही दुर्घटना प्रशासनाच्या निष्क्रियतेचे जळजळीत उदाहरण ठरली!

Read Also : https://ajinkyabharat.com/rohit-sharmachaya-jagi-sai-sudarshanchi-entry-england-daunasathi-sambya-youth-opener/

Related News